यश दयालवर बलात्काराचा आरोप
जयपूरमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने यश दयालवर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी संगानेर सदर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराच्या आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली FIR नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार मुलीच्या म्हणण्यानुसार, दयालने तिला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचे आश्वासन देऊन दोन वर्षांपर्यंत तिचं शोषण केलं. पहिला प्रसंग ती 17 वर्षांची असताना घडल्याचे सांगण्यात आले आहे, तर नवीन घटना IPL 2025 दरम्यान घडली, जेव्हा तिला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये बोलावल्याचा आरोप दयाल याच्यावर आहे.
advertisement
लैंगिक छळ आणि फसवणुकीचा आरोप
2025 च्या सुरुवातीला गाझियाबादमधील एका महिलेने यश दयालवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचा आरोप केला होता. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने पाच वर्षांपर्यंत भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 69 अंतर्गत या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात यश दयालच्या पोलीस कोठडीला स्थगिती दिली आहे.
यश दयालचं क्रिकेट करियर
दरम्यान, यश दयाल पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याला 2022 च्या आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने आपल्या पहिल्याच सीझनमध्ये छाप पाडली आणि 11 विकेट घेतल्या. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले, ज्यात दयाळचाही महत्त्वाचा वाटा होता. २०२३ चा आयपीएल सीझन त्याच्यासाठी एक वाईट स्वप्नासारखा होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या एका मॅचमध्ये रिंकू सिंगने त्याच्या एका ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स मारले. आयपीएल 2025 मध्येही यश दयाळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता आणि त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने 15 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या.