खरं तर 17 व्या ओव्हरमध्ये हा ड्रामा घडला. 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर दिग्वेश राठीने जितेश शर्माला नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट केले. राठी बॉल टाकण्याआधीच जितेशने क्रिज सोडले. त्यामुळे याचा फायदा घेऊन राठीने त्याला रनआऊट केले. अंपायरला सूरूवातीला वाटलं राठी जितेशला वॉर्निंग देत आहे. पण राठीने थेट अंपायरकडे अपील केलं.
advertisement
अंपायरने त्यानंतर थेट वर्ड अंपायरला डिसिजन देण्यास सांगितले."बॉलरने त्याचा डिलिव्हरी स्ट्राईड पूर्ण केला आणि पॉपिंग क्रीज पास केला," थर्ड अंपायर म्हणतात. मोठ्या स्क्रीनवर नॉट आउट चमकला होता. या दरम्यान पंतने मध्यस्थी करून अपील घेण्यास सांगितले होते.त्यानंतर जितेश शर्माने त्याची गळाभेट घेतली आणि आभार मानले होते. त्यामुळे पंतने उत्तम खेळाडू भावना दाखवली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w/c), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेशसिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरर्के