शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील या थरारक मॅचमध्ये नदीन डी क्लर्कने ऐतिहासिक कामगिरी केली. आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज असताना मुंबईची अनुभवी नैट सायव्हर ब्रंट बॉलिंगसाठी आली. ओव्हरचे पहिले 2 बॉल्स डॉट गेल्याने मुंबईचा विजय निश्चित वाटत होता, मात्र त्यानंतर डी क्लार्कने रुद्र अवतार धारण केला. तिने पुढच्या 4 बॉल्सवर 6, 4, 6, 4 अशा रन्सची बरसात करत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
advertisement
'प्लेयर ऑफ द मॅच'
नादिन डी क्लार्कने या मॅचमध्ये केवळ बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही आपली छाप पाडली. तिने 44 बॉल्समध्ये नाबाद 63 रन्सची खेळी केली, ज्यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. त्याआधी बॉलिंग करताना तिने मुंबईच्या 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव धक्कादायक ठरला असून कॅप्टन हरमनप्रीत कौरला आता पुढच्या मॅचसाठी रणनीतीत बदल करावा लागणार आहे.
नदीन डी क्लार्कने चित्र पालटलं
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत आरसीबीने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. मुंबईची टीम ही मॅच सहज जिंकेल असे वाटत असतानाच नादिन डी क्लार्कने खेळाचे चित्र पालटले. आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज असताना डी क्लार्कने नैट सायव्हर ब्रंटच्या बॉलिंगवर 2 फोर आणि 2 सिक्स मारून अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. मुंबईच्या बॉलर्सना मोक्याच्या क्षणी आपली लय टिकवता आली नाही, ज्याचा फायदा आरसीबीला मिळाला.
मुंबई इंडियन्स बॅटिंग अपयशी
या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या अनुभवी ऑलराउंडर खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र बॅटिंगमध्ये त्या अपयशी ठरल्या. नैट सायव्हर ब्रंट केवळ 4 रन्स करून बाद झाली आणि नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये तिने खूप रन्स दिले. टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर देखील सेट झालेली असताना 20 रन्सवर आऊट झाली. कॅप्टन म्हणून शेवटच्या ओव्हर्समध्ये योग्य बॉलर निवडण्यात तिची चूक झाली, जी मुंबईला महाग पडली.
पहिली मॅच देवाला...
अमेलिया केरने बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी, बॅटिंगमध्ये ती पूर्णपणे फ्लॉप ठरली. तिने 15 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स केले, ज्यामुळे मुंबईचा रन रेट कमी झाला. मुंबईच्या या धिम्या बॅटिंगचा फटका त्यांना मॅचच्या निकालात बसला. पहिली मॅच देवाला ही मुंबई इंडियन्सची परंपरा आहे. हीच परंपरा आता हरमनप्रीत कौरने देखील कायम ठेवल्याचं पहायला मिळालंय.
