थँक्यू रिंकू भय्या...
रिंकु सिंगने आपल्या बहिणीला वाढदिवसाला एक स्कूटी भेट दिली. भाऊ-बहिणीच्या या पवित्र नात्यातील भावनिक क्षणाचे छायाचित्र समोर येताच, फॅन्सकडून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देण्यात आल्या. नेहा सिंहने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती भाऊ रिंकू सिंह आणि नवीन स्कूटीसोबत दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘थँक्यू रिंकू भय्या.’ हा फोटो रिंकूच्या अलीगढमधील बंगल्याचा आहे, जो त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विकत घेतला होता.
advertisement
3.5 कोटींचं घर
शहराच्या बाहेरील बाजूस ओझोन सिटीमध्ये असलेल्या या तीन मजली घराला रिंकूने आई वीणा यांच्या नावावरून वीणा पॅलेस असे नाव दिले आहे. या घराची किंमत जवळपास 3.5 कोटी रुपये आहे. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या रिंकू सिंहने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत सर्वांना चकित केले. केकेआर (KKR) कडून खेळताना रिंकूने गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स मारून आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार
दरम्यान, या कामगिरीनंतर तो एक मोठा सुपरस्टार खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला. फ्रेंचायझीने देखील त्याच्यावर पैशांची बरसात केली. सध्या तो भारतासाठी वनडे आणि T20 मध्ये डेब्यू करून टीममधील आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. रिंकू भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असलेल्या टी-ट्वेंटी टीमचा देखील भाग आहे.