रिंकूच्या बॅटमधून विनिंग रन
27 वर्षीय रिंकू सिंगने या स्पर्धेपूर्वीच हाय-प्रेशर मॅचमध्ये भारतासाठी मॅच संपवणारा खेळाडू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. एशिया कप फायनलमध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रिंकूने शांतपणे हॅरिस रौफच्या बॉलवर मिड-ऑनवरून फ्लिक केला आणि नाट्यमय पद्धतीने विजय निश्चित केला होता. आशिया कपच्या फायनलमध्ये आपल्या बॅटमधून विनिंग रन येणार, असं रिंकूने 6 सप्टेंबर रोजी एका चिठ्ठीवर लिहिलं होतं आणि तेच खरं झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
टीम जिंकली आणि मला खूप आनंद झाला
मॅचनंतर आनंदित झालेल्या रिंकू सिंगने सांगितलं, दुसरं काही महत्त्वाचं नाही. हा एक बॉल महत्त्वाचा होता. एक रन हवा होता. मी फोर मारला. मी एक फिनिशर आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. टीम जिंकली आणि मला खूप आनंद झाला, असं रिंकू सिंग म्हणाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी आणि समालोकच संजना गणेशन हिने रिंकूने लिहिलेली चिठ्ठी सर्वांना दाखवली.
तिलक वर्माची चिठ्ठी खरी
दरम्यान, रिंकू सिंगसह तिलक वर्माने देखील लिहिलेली चिठ्ठी खरी ठरली. फायनल सामन्यात रन्स स्कोर करणे आणि टीम इंडिया जिंकवून देणं, हे तिलक वर्माने चिठ्ठीत लिहिलं होतं. तेच खरं देखील झाल्याचं पहायला मिळतंय. संजना गणेशन हिने तिलक वर्माची देखील चिठ्ठी दाखवली.