ऋषभ पंतचं कॅप्टन म्हणून क्रिकेटमध्ये पुनरागमन
बीसीसीआयने आयोजित केलेल्या सामन्यांद्वारे (India A vs South Africa A) विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत कॅप्टन म्हणून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून बरा झाला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या 4-दिवसीय सामन्यासाठी असलेल्या टीममध्ये केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांसारख्या वरिष्ठ प्लेअर्सचा समावेश आहे.
advertisement
पहिल्या मॅचसाठी इंडिया ए संघाचा स्कॉड - ऋषभ पंत (कॅप्टन), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन (व्हाईस कॅप्टन), देवदत्त पडिककल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी आणि सरांश जैन.
दुसऱ्या मॅचसाठी इंडिया ए संघाचा स्कॉड - ऋषभ पंत (कॅप्टन), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन (व्हाईस कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.