गंभीरचा ऑलराऊंडर प्लॅन फेल
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर ढेपाळल्याचं पहायला मिळालं. शुभमन गिल मैदान सोडून बाहेर गेल्यानंतर टीम इंडियाचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. केएल राहुलने सर्वाधिक 39 धावा केल्या. त्यानंतर पंत आणि जडेजा यांनी प्रत्येकी 27 धावांचं योगदान दिलं. तसेच गंभीरच्या प्लॅनिंगमधले सगळे ऑलराऊंडर फेल ठरल्याचं दिसून आलं. त्यामुळे टीम इंडिया फक्त 189 धावांवर ऑलआऊट झाली.
advertisement
ऋषभ पंतच्या खांद्यावर टेस्ट मॅचची जबाबदारी
टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे मैदानातून बाहेर जावं लागलं. आता त्याला फिजीओकडे नेण्यात आलंय. अशातच टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत याला संघाची जबाबदारी सोपवली असून गंभीरच्या मार्गदर्शनासाठी ऋषभ पंत मैदानात टीम इंडियाची लीड करतोय. तसेच बीसीसीआयने शुभमन गिलच्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली आहे.
बीसीसीआयने दिली शुभमनच्या दुखापतीची अपडेट
दरम्यान, शुभमन गिलला मानेचा त्रास आहे आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. त्याच्या प्रगतीनुसार आज त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. शुभमन गिलला आज सकाळपासून मानेचा त्रास होत होता. सकाळी शुभमनने मानेच्या त्रासाची तक्रार केली होती.
