TRENDING:

Rishabh Pant : पंतमुळे झहीरचा पत्ता कट होणार? खराब कामगिरीनंतर गोयंका करणार हकालपट्टी

Last Updated:

लखनऊ संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. रिषभ पंतच्या खराब कामगिरीचा फटका आता झहीर खानला बसणार आहे. संजीव गोयंका झहिर खानची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rishabh Pant News : आयपीएलनंतर टीम इंडियाचा नवा टेस्ट कर्णधार शुभमग गिल आणि उप कर्णधार रिषभ पंत इंग्लंडला रवाना झाले आहेत. या दौऱ्यात टीम इंडिया इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. या मालिकेआधीच लखनऊ संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. रिषभ पंतच्या खराब कामगिरीचा फटका आता झहीर खानला बसणार आहे. संजीव गोयंका झहिर खानची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे.
rishabh pant zaheer khan
rishabh pant zaheer khan
advertisement

खरं तर आयपीएलमध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वातील लखनऊ सूपर जाएंट्स संघ सहाव्या क्रमांकावर राहिला. 14 सामन्यापैकी रिषभ पंतच्या नेतृत्वात लखनऊने 6 सामने जिंकले होते. लखनऊच्या या खराब कामगिरीचा फटका आता झहीर खानला बसण्याची शक्यता आहे. कारण मॅनेजमेंट झहीर खानचं कॉन्ट्रॅक्टअजिबात वाढवण्याचा विचार करत नाही आहे. तसेच संघातील काही लोक झहीरच्या असण्याने खूश नाही आहेत. अशा परिस्थितीत लखनऊच्या खराब कामगिरीचा फटका आता झहीर खानला बसणार आहे.

advertisement

क्रिकबझच्या वृत्तानुसार, झहीरला एक वर्षाचा करार मिळाला होता. आता हा करार आणखी वाढवता येणार नाही.त्यात संघातील काही लोक आणि व्यवस्थापन झहीरवर नाराज आहेत. तर जस्टिन लँगर संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.पण याआधी लँगरला काढून टाकले जाऊ शकते, अशी चर्चा होती.परंतु आता झहीर खानकडे अधिक लक्ष दिले जात आहे.

दरम्यान गेल्या दोन हंगामात लखनौला प्लेऑफमध्ये पोहोचता आलेले नाही. लखनौ पुढील आयपीएलसाठी तयारी करत आहे. संघात मोठे बदल होऊ शकतात. अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. पण आत काहीतरी सुरू आहे. झहीर खानबद्दल संघात असंतोष आहे. याचा अर्थ काही लोक त्याच्यावर खूश नाहीत. ही असंतोष का आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु असे मानले जाते की काही लोक संघाच्या कामगिरीवर निराश आहेत. झहीर खान संघात सुधारणा करण्यात यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याचा करार वाढवला जाणार नाही,अशी माहिती आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rishabh Pant : पंतमुळे झहीरचा पत्ता कट होणार? खराब कामगिरीनंतर गोयंका करणार हकालपट्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल