TRENDING:

VIDEO : पंतला अखेर सूर गवसला, बंगळुरूविरूद्ध ठोकलं शतक, सेंच्युरीनंतर मैदानात मारल्या उड्या

Last Updated:

RCB vs LSG : आयपीएलमध्ये आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रिषभ पंतची अखेर बॅट तळपली आहे.बंगळुर विरूद्ध शेवटच्या साखळी सामन्यात लखनऊ सुपर जाएट्सचा कर्णधार रिषभ पंतने शतक ठोकलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
RCB vs LSG : आयपीएलमध्ये आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रिषभ पंतची अखेर बॅट तळपली आहे.बंगळुर विरूद्ध शेवटच्या साखळी सामन्यात लखनऊ सुपर जाएट्सचा कर्णधार रिषभ पंतने शतक ठोकलं आहे. 54 बॉलमध्ये पंतने हे शतक ठोकलं आहे. या शतकीय खेळीत त्याने 6 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. दरम्यान मैदानात कोलांटी उडी मारून हे शतक ठोकलं आहे. या शतकाची आता चर्चा रंगली आहे.
rishabh pant century celebration
rishabh pant century celebration
advertisement

खरं तर आयपीएलचा संपूर्ण हंगाम रिषभ पंत बॅट चाललीच नाही. तो धावा काढताना मैदानात संघर्ष करताना दिसला होता. मात्र आज बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने 61 बॉल 118 धावांची सर्वांधिक खेळी केली. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 11 चौकार मारले आहेत. पंतच्या या खेळीच्या बळावर लखनऊ सूपर जाएंट्स 200 धावांच्या पार गेली.

advertisement

दरम्यान रिषभ पंतच्या सर्वाधिक 118 धावा आणि मिचेल मार्शच्या 67 धावांच्या बळावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 227 धावा ठोकल्या आहे. त्यामुळे रॉयल चँलेंजर्स बंगळुरूसमोर 228 धावांचे आव्हान आहे. बंगळुरूकडून नुवान तुषारा, भुवनेश्वर कुमार आणि रोमारीओ शेफर्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

advertisement

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w/c), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेशसिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरर्के

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : पंतला अखेर सूर गवसला, बंगळुरूविरूद्ध ठोकलं शतक, सेंच्युरीनंतर मैदानात मारल्या उड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल