सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये रियान पराग युट्यूबवर काही सर्च करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सर्चमध्ये त्याने आधी शोधलेल्या गोष्टी सजेस्ट होत होत्या. त्यात अनन्या पांडे हॉट, सारा अली खान हॉट, विराट कोहली असं सर्च केल्याचं दिसतं.
एका ट्विटर युजरने त्याच्या पोस्टमध्ये दावा केला की रियान परागची ही खरी सर्च हिस्ट्री आहे. रियान परागची सर्च हिस्ट्री सारा अली खान हॉट, विराट कोहली, अनन्या पांडे हॉट असं युजरने पोस्ट केलं आहे.
मोदी, शहा, सचिन, धोनीला बनायचंय टीम इंडियाचा कोच, अर्जामुळे BCCIची डोकेदुखी वाढली
रियान परागच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. तर एका युजरने म्हटलं की, भारतीय मुलगा, बनियान घालून अभिनेत्रींबाबत शोधत आहे. अनेक लोक परागच्या भावना समजू शकतात.
रियान परागच्या या व्हिडीओवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, काहींनी त्याला ट्रोल केलं तर काहींनी इतरांच्या सर्च हिस्ट्रीमध्ये डोकावू नये असं असेही सल्ले दिले आहेत. दरम्यान, रियान परागचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा की खोटा याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही.