TRENDING:

Rohit Sharma : वानखेडेवर पहिल्याच दिवशी संजूला सांगितलं होतं, 23 दिवसानंतर खरी ठरली हिटॅमनची भविष्यवाणी!

Last Updated:

Rohit Sharma On Sanju Samson : रोहित शर्माने 23 दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचं पहायला मिळतंय. आयसीसीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma prediction On Sanju Samson : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये येत्या 5 तारखेला भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडेवर सेमीफायनलचा सामना पार पडणार आहे. टीम इंडियाने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्ड कपच्या रेसमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. संजू सॅमसनच्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ही मॅच जिंकली. संजूला टीम इंडियामध्ये संधी मिळत नव्हती. अशातच ऑफ स्पिनर्सचा मुद्दा पुढे आल्याने अखेर टीम इंडियाला राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन खेळवावं लागलं. अशातच आता रोहित शर्माने 23 दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचं पहायला मिळतंय. आयसीसीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Rohit Sharma prediction On Sanju Samson
Rohit Sharma prediction On Sanju Samson
advertisement

रोहितने संजूची भेट घेतली

भारत आणि युएसए यांच्यात जेव्हा सामना होता, त्यावेळी ओपनिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बासिटर असलेला रोहित शर्मा त्याठिकाणी उपस्थित होता. रोहितने टीम इंडियाच्या खेळाडूंची देखील यावेळी भेट घेतली. त्यावेळी त्याला संजू देखील दिसला. रोहित शर्माने संजू सॅमसनची भेट घेतली. त्यावेळी रोहितने असं काही म्हटलं की, 23 दिवसांनी ती गोष्ट खरी ठरली.

advertisement

दु:खी होऊ नकोस... तुला देखील संधी मिळेल

संजूला पाहताच रोहित शर्माने कसा आहेस? असा प्रश्न केला. त्यावर चेताने मी मस्त आहे, असं हिटमॅनला सांगितलं. त्यावर रोहितने असं काही म्हटलं की, संजूचा आशा उंचावल्या. दु:खी होऊ नकोस... तुला देखील संधी मिळेल... ही मोठी टुर्नामेंट आहे. कधीही संधी मिळू शकते, असं रोहित शर्मा म्हणताना दिसतोय, बरोबर 23 दिवसानंतर रोहितचं वाक्य खरं ठरलं. संजू सॅमसनच्या मॅचविनिंग इनिंगनंतर आयसीसीने याचा व्हिडीओ शेअर केलाय.

advertisement

Sanju Samson : संजूला झालाय रोहित शर्माचा आजार! ड्रिंक्स ब्रेकमध्ये रिंकु बॅट घेऊन गेला, पाहा मजेशीर Video

हिटमॅनसोबत खास नातं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आल्याचे दर तेजीत, डाळिंबला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यातील नातं खास आहे. रोहित शर्माने संजूची पारख केली अन् त्याला इंटरनॅशनल स्टेजवर घेऊन आला. परंतू टीम इंडियामध्ये मोठी स्पर्धा असल्याने संजूला संधी मिळाली नाही. पुढे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसनला संधी मिळाली. आता संजू वर्ल्ड कपमध्ये धमाका करतोय. संजूसाठी आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. त्याला पुढील दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी करून दाखवायची आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : वानखेडेवर पहिल्याच दिवशी संजूला सांगितलं होतं, 23 दिवसानंतर खरी ठरली हिटॅमनची भविष्यवाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल