Sanju Samson : संजूला झालाय रोहित शर्माचा आजार! ड्रिंक्स ब्रेकमध्ये रिंकु बॅट घेऊन गेला, पाहा मजेशीर Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanju Samson forgetting bat like Rohit sharma : वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच जिंकवून देणाऱ्या संजू सॅमसनचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आलाय. त्यात तो बॅट विसरल्याचं दिसतोय.
Sanju Samson Viral Video : टीम इंडियाचा चेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार 97 धावांची खेळी केली. वर्च्युअल क्वार्टर फायनल असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर इंग्लंडच्या टीमने धास्ती घेतली आहे. इंग्लंडची सेमीफायनल मॅच भारताविरुद्ध आणि तेही वानखेडे स्टेडियमवर... त्यामुळे आता संजू वानखेडेवर देखील आपली जादू दाखवू शकतो. अशातच आता संजू सॅमसनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याच तो रोहित शर्मा झालेला दिसतोय.
संजू सॅमसन याने काल 12 ओव्हरनंतर संघाची जबाबदारी स्विकारली अन् टीम इंडियाला एक बाजूने खेचून विजयापर्यंत पोहोचवलं. त्यावेळी संजूला डगआऊटमधून वारंवार सुचना मिळत होत्या. गंभीरने प्रॉपर प्लॅन तयार करून दिल्यानंतर संजूने त्यावर अंमलबजावणी केली अन् टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. अशातच एकदा ओव्हर्सच्या दरम्यान रिंकु सिंग संजूसाठी निरोप घेऊन आला.
advertisement
रिंकू भाई ने बल्ला लौटा दिया नहीं तो संजू सैमसन इतने रन कैसे बना पाते।
रिंकू सिंह 12th मैन फील्डिंग सपोर्ट में थे और पानी देने के लिए Sanju Samson के पास गए थे।
लौटते वक्त गलती से Sanju का बैट भी साथ लेकर चल दिए। pic.twitter.com/083NxhPfmg
— Ankit Yadav (@Ankitydv92) March 2, 2026
advertisement
गंभीरने रिंकु सिंग आणि कुलदीप यादव यांना मेसेज घेऊन पाठवलं. त्यावेळी संजूने बॅट रिंकुकडे दिली. रिंकूने बॅटला बगलत ठेवली अन् त्याला पाणी आणि टॉवेल दिला. संजूने घाम पुसून झाल्यावर गंभीरचा मेसेज ऐकला अन् बॅटिंग करायला निघाला पण याचवेळी त्याची बॅट घेऊन रिंकु डगआऊटकडे निघाला. आपल्या हातात काहीच नाही, याची जाणीव झाल्यावर संजू मागे फिरला अन् रिंकुला बॅट मागितली. त्यानंतर रिंकु आणि संजू या दोघांना हसू आवरलं नाही.
advertisement
दरम्यान, हा सिन पाहून प्रेक्षकांना थेट रोहित शर्माची आठवण झाली. रोहित शर्माचा विसरभोळेपणा कुणाला माहिती नाही. प्रत्येक ठिकाणी रोहित काही ना काही विसरत असतो. अशातच आता संजूने नक्कीच त्याची जागा चालवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 12:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : संजूला झालाय रोहित शर्माचा आजार! ड्रिंक्स ब्रेकमध्ये रिंकु बॅट घेऊन गेला, पाहा मजेशीर Video










