advertisement

IND vs WI : संजूला 'जादू की झप्पी' पण पार्टनरला हाडतूड! प्रेस कॉन्फरेन्समध्ये थेट इग्नोर केलं, गंभीरच्या टार्गेटवर कोण?

Last Updated:

Gautam Gambhir Press Conference : संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची मॅच विनिंग खेळीमुळे टीम इंडियाने सामना जिंकला. त्यामुळे गंभीरने मैदानात येताच संजू सॅमसनला जादू की झप्पी दिली.

Gambhir hugging Sanju Samson after But Ignore Abhishek
Gambhir hugging Sanju Samson after But Ignore Abhishek
Gautam Gambhir hugging Sanju Samson : गेल्या महिन्याभरापासून टीम इंडियाच्या ओपनिंग ऑर्डरमध्ये मोठे बदल दिसून आले. कधी अभिषेक आणि ईशान किशन... कधी ईशान आणि संजू... तर आता अभिषेक आणि संजू सलामीला येतात. जरी मैदानात परिस्थिती तसं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस पहायला मिळत आहेत. अशातच आता संजू सॅमसनने अफलातून खेळ करत वेस्ट इंडिजला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं आहे. तर टीम इंडियाने दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. अशातच आता गंभीरने देखील मॅचविनिंग खेळीनंतर संजूला जादू की झप्पी दिली. तर दुसरीकडे गंभीरने संजूच्या पार्टनरला इन्गोर केलं.

संजू सॅमसनला जादू की झप्पी

संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची मॅच विनिंग खेळीमुळे टीम इंडियाने सामना जिंकला. त्यामुळे कोलकाताच्या मैदानावर गंभीर भलताच खुश झाला. गंभीरने मैदानात येताच संजू सॅमसनला जादू की झप्पी दिली. तर इतर खेळाडूंनी देखील संजूचं तोंडभरून कौतूक केलं. टीम इंडियाचा चेता पहिल्यांदाच धहाडला सेमीफायनलला घेऊन गेला. पण त्याचवेळी गंभीर अभिषेक शर्मावर नाराज असल्याचं पहायला मिळतंय. अभिषेक आऊट झाल्यावर गंभीरने खुन्नस दिली होती.
advertisement

गंभीरने  रागात अभिषेककडं पाहिलं

टीम इंडियाला मैदानात दोन्ही सलामीविरांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण अभिषेक शर्माने टीम इंडियाला दगा दिला. अभिषेक अवघ्या 10 धावा करून बाद झाला होता. अभिषेकची ही बॅटींग पाहून डगआऊटमध्ये बसलेला गंभीर प्रचंड नाराज झाला होता. अभिषेक डगआऊटच्या दिशेने येत असताना गंभीरने तोंड पाडून रागात अभिषेककडं पाहिलं. तर प्रेस कॉन्फरेनमध्ये गंभीरने अभिषेकचं नाव देखील घेतलं नाही.
advertisement

अभिषेकचं नावही घेतलं नाही

टीम इंडियाची सलामीवीर जोडी अनेकदा बदलावी लागली आहे, त्यामुळे इंग्लंडविरुद्ध देखील अशीच रणनिती असणार का? असा सवाल गंभीरला जेव्हा विचारला गेला. त्यावेळी त्याने थेट अभिषेकचं नाव घेणं देखील पसंत केलं नाही. संजू सॅमसन आणि इशान किशन यांची चांगली कामगिरी करून दाखवलीये. त्यामुळे आम्हाला टॉप ऑर्डरची चिंता नाही, असं गंभीर म्हणाला होता. त्यामुळे अभिषेकच्या कामगिरीवर गौतम गंभीर नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : संजूला 'जादू की झप्पी' पण पार्टनरला हाडतूड! प्रेस कॉन्फरेन्समध्ये थेट इग्नोर केलं, गंभीरच्या टार्गेटवर कोण?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement