advertisement

हाऊसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा कधीपर्यंत घ्यावी? कायदेशीर नियम काय आहेत?

Last Updated:

Society Meeting Rules : सहकारी गृहनिर्माण संस्थेची (Housing Society) वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) वेळेत न घेणे ही अनेक सोसायट्यांमध्ये आढळणारी गंभीर बाब ठरत आहे.

Housing Society Annual Meeting
Housing Society Annual Meeting
मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थेची (Housing Society) वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) वेळेत न घेणे ही अनेक सोसायट्यांमध्ये आढळणारी गंभीर बाब ठरत आहे. मात्र कायद्यानुसार प्रत्येक सोसायटीने ठराविक कालमर्यादेत AGM घेणे बंधनकारक असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यवस्थापन समितीवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे “AGM कधीपर्यंत घ्यावी?” आणि “कायदेशीर नियम नेमके काय सांगतात?” हे जाणून घेणे प्रत्येक सभासद आणि पदाधिकाऱ्यासाठी महत्त्वाचे ठरते.
वार्षिक सर्वसाधारण सभा कधीपर्यंत घेणे बंधनकारक असते?
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेपर्यंत बोलवावी. काही कारणांमुळे मुदतवाढ घ्यायची असल्यास नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करून १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ घेता येते. १४ ऑगष्टपर्यंत मुदतवाढ न घेता व १४ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ घेवून सध्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसेल तर नोंदणी अधिकारी प्राधिकृत अधिकारी नेमून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कारवाई करू शकतात.
advertisement
सभेमध्ये कोणते विषय घ्यावे लागतात?
कायद्यानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही ठराविक विषय अनिवार्यपणे मांडणे आवश्यक आहे. त्यामध्ये मागील वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल (Audit Report), उत्पन्न-खर्च पत्रक, ताळेबंद (Balance Sheet), पुढील वर्षाचा अंदाजपत्रक, देखभाल शुल्काचा आढावा, निवडणुका (जर कालावधी संपत असेल तर) आणि इतर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय यांचा समावेश होतो.सभाशिवाय हे निर्णय कायदेशीर मानले जात नाहीत.
advertisement
सभासदांचे अधिकार काय?
सभा वेळेत न घेतल्यास सभासद गप्प बसण्यास बांधील नाहीत. कायद्यानुसार, सभासद लेखी मागणी करून AGM घेण्याचा आग्रह धरू शकतात. समिती दुर्लक्ष करत असल्यास निबंधकांकडे थेट तक्रार करता येते.सभेतील आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्याचा पूर्ण अधिकार सभासदांना आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हाऊसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा कधीपर्यंत घ्यावी? कायदेशीर नियम काय आहेत?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement