घरी रात्री जेवणासाठी बोलवलं
भारतीय संघ दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे आणि त्यापूर्वी सर्वांना गंभीरच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात येईल. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला घरी रात्री जेवणासाठी बोलवलं आहे. सूत्रांनी स्पोर्ट्स तकला सांगितलं की, 8 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियममध्ये होणाऱ्या सराव सत्रानंतर संपूर्ण संघ गंभीरच्या घरी जेवणासाठी जाईल. तुम्हाला आठवत असेल तर, रोहित शर्माला टेस्ट कॅप्टन्सीवरून हटण्याआधी गौतम गंभीरने शुभमनला डिनरला घरी बोलवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा रोहितला वनडे कॅप्टन्सीवरून काढल्यानंतर गंभीरच्या घरी पार्टी होणार आहे.
advertisement
दुसरा कसोटी सामना
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आत्मविश्वासाने भरलेली असेल. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत एक डाव आणि 140 धावांनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकावा लागेल किंवा ड्रॉ करावा लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)
शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.