ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माकडे कर्णधार पद राहिलं असा त्याला देखील नक्कीच अंदाज होता. कारण गेल्या काही महिन्यांपासून त्याने ज्याप्रकारे फिटनेसवर काम केलं आहे. आपलं अनियंत्रित वजन कमी केलं आहे.ते पाहता त्याने एकप्रकारे स्वत:ला सिद्ध केलं होतं.त्यामुळे आपल्याकडे कर्णधार पद राहिल अशी आशा होता. पण 2 सप्टेंबरचा दिवस उजाडला आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. आणि रोहितच्या हातातून वनडेच कर्णधारपद काढून घेण्यात आलं.या घटनेनंतर असंख्य चाहत्यांची निराशा झाली होती.
advertisement
रोहित शर्मा देखील या निर्णयाने प्रचंड निराश होता. त्यामुळेच या घडामोडीवर त्याने काही एक भाष्य केले नव्हते. पण आता संघ जाहीर होण्याच्या 48 तासानंतर आता रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत रोहित शर्मा मैदानात घाम गाळताना दिसतो आहे.त्यामुळे रोहितने थेट आता आपल्या बॅटनेच उत्तर देण्याचे ठरवल्याचे समजते.कारण 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सूरूवात होत आहे.त्यामुळे साधारण 13 दिवस आधीच रोहितने सरावाला सूरूवात केली आहे.त्यामुळे या सरावातूनच त्याने बीसीसीआयला एकप्रकारे खुनवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो धुमाकुळ घालणार आहे.त्यामुळे हे बीसीसीआयला मोठं उत्तर असण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन