मुंबईसाठी चांगला दिवस - रोहित शर्मा
सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला, "या हंगामात माझ्या केवळ चार फिफ्टी आहेत. मला अजून जास्त फिफ्टी करायला आवडलं असतं. पण संघासाठी आजचा दिवस खूप चांगला होता. या एलिमिनेटर सामन्याचे आणि पुढील टप्प्यात जाण्याचं महत्त्व मला चांगलंच समजलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यात देखील मुंबई इंडियन्सला अशीच चांगली कामगिरी करावी लागेल", असंही रोहित शर्मा म्हणाला.
advertisement
कॅच सुटला तरी तुला...- रोहित शर्मा
त्याने आपल्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या कामगिरीला महत्त्व दिले. "एकीकडे सर्व काही बाजूला ठेवून मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. संघासाठी मी माझे काम कसे करू शकेन, याचीच खात्री करत असतो." रोहितला सामन्यात दोन जीवदान मिळाले होते आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पण असं नसतं की दोन जीवदान मिळाल्यानंतर तुम्हाला सुट मिळते, त्यानंतर देखील तुम्हाला धावा कराव्या लागतात, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे. "मला मिळालेल्या नशिबाचा मला फायदा करून घ्यायचा होता. मी ते करू शकलो याचा आनंद आहे. संघाला चांगल्या स्थितीत आणू शकलो.", असंही रोहित यावेळी म्हणाला.
मला नशिबाची साथ मिळाली कारण...
रोहितने गोलंदाजांचीही प्रशंसा केली. "दव पडणार असल्याने आव्हान अधिक मोठे होणार होते. पण गोलंदाजांनी संयम खूप चांगला राखला." आपल्या खेळीतील फटक्यांबद्दल बोलताना तो म्हणाला, "खरं सांगायचं तर, मी हे शॉट्स या स्पर्धेत यापूर्वीही खेळलो आहे आणि त्यावेळी थेट फिल्डरच्या हातात बॉल गेला आहे. कधीतरी नशिबाची साथ लागते आणि आज तो दिवस माझ्यासाठी होता. मला नशिबाची साथ मिळाली कारण ते कॅच सुटला तरी... पण त्यानंतरही तुम्हाला खेळत राहायला लागतं. मी वेग आणि लय कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं.", असंही हिटमॅन म्हणाला.
जॉनी बेअरस्टोचं कौतुक
नवीन खेळाडू जॉनी बेअरस्टोबद्दल बोलताना रोहितने त्याचं कौतुक केलं. "जॉनीला मी अनेक वर्षांपासून दुसऱ्या बाजूने पाहिले आहे. त्याची गुणवत्ता आपल्याला माहीत आहे. या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा त्याला खूप अनुभव आहे. हा त्याचा पहिला सामना आहे असे कधीच वाटले नाही. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली आणि आम्ही त्याचा फायदा घेतला."
दरम्यान, या विजयासह मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 मध्ये दाखल झाली असून, आता त्यांचा सामना क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या पंजाब किंग्जशी होणार आहे. तर फायनलमध्ये आरसीबी नंगी तलवार घेऊन उभी आहे.