रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील कथित मतभेदांच्या वृत्तांना सितांशू कोटकने पूर्णविराम दिला आहे.यावर कोटक यांनी स्पष्ट केले की रोहित आणि विराट केवळ संघ व्यवस्थापनाशी संपर्कात नाहीत तर भविष्यातील नियोजनात देखील सक्रियपणे सहभागी आहेत.त्यामुळे प्रशिक्षक आणि सिनिअर खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
खरं तर मध्यंतरी मुख्य प्रशिक्षक आणि दोन्ही महान फलंदाजांमधील संबंध ताणले गेल्याची चर्चा होती. पण सितांशू कोटक यांनी हे दावे फेटाळून लावले आहे.रोहित आणि विराट संघाच्या नियोजन प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी आहेत. दोन्ही खेळाडू त्यांचे अनुभव शेअर करतात, रणनीतींवर चर्चा करतात आणि आगामी दौऱ्यांसाठी सूचना देतात,असे देखील कोटक यांनी सांगितले.
22 महिन्यांनी होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषकाला लक्षात घेऊन दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या नियोजनात सहभागी आहेत.कोटक स्वतः या बैठकींचा भाग आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच हे उघड केले आहे की दोन्ही वरिष्ठ खेळाडू प्रत्येक पैलूवर चर्चा करतात.
विराट रोहित निश्चितच त्यांचे अनुभव शेअर करतात.मी त्यांना नेहमीच एकमेकांशी बोलताना पाहतो.विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संवादाच्या कमतरतेच्या अफवांबद्दल ते म्हणाले, साहजिकच, तुम्हाला सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी दिसतात, ज्या मी टाळण्याचा प्रयत्न करतो.
तसेच दोघेही खूप वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहेत.ते स्वतःचे नियोजन करतात.जर त्यांना वाटत असेल की त्यांनी प्रथम एखाद्या ठिकाणी जाऊन सराव करावा,तर ते करतात.त्यांना त्यांच्या शरीरासाठी,तंदुरुस्तीसाठी आणि फलंदाजीसाठी काय आवश्यक आहे हे माहित आहे.ते पूर्णपणे व्यावसायिक आहेत.त्यांना काय करावे हे सांगण्याची गरज नाही.त्यांच्याकडे इतका अनुभव आहे की ते इतर खेळाडूंना खूप काही शिकवू शकतात आणि ते तसे करतात, असे सितांशु कोटक यांनी सांगितले.
