महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आगामी बूची बाबू 2025 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडला एक सामान्य खेळाडू म्हणून खेळण्यात येणार आहे. कारण महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अंकित बावणेच्या खांद्यावर देण्यात आली आहे.त्यामुळे ऋतुराजला झटका बसला आहे.
खरं तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची माळ ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर दिली होती. पण त्यानंतर आता अचानक त्याच्या जागी अंकित बावणेचे नाव समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पृथ्वी शॉला संघात संधी
टीम इंडियातून अनेक वर्ष बाहेर असलेल्या पृथ्वी शॉला महाराष्ट्राच्या 17 सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे.पृथ्वी शॉने काहीच दिवसांपूर्वी मुंबईची साथ सोडत एमसीएसचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र क्रिकेट संघात प्रवेश केला होता.तेव्हापासून त्याला संघात संधी मिळेल,असे बोलले जात होते.
चेन्नईमध्ये अखिल भारतीय बुची बाबू स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बूची बाबू स्पर्धेसाठी मुंबई संघाचीही घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी मुंबईच्या 17 सदस्यीस संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी 18 वर्षीय आयुष म्हात्रेच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपकर्णधारपदी सुवेद पार्कर असणार आहे.
महाराष्ट्र संघ : अंकित बावणे (कर्णधार),ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धस, अर्शिन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धेश म्हात्रे, सौरभ नवाले (विकेटकिपर), मंदार भंडारी (विकेटकिपर),रामकृष्णा घोष,मुकेश चौधरी,प्रदीप दाधे, विकी ओसवाल,हितेश वालूंज, प्रशांत सोलंकी, राजवर्धन हंगेकर
मुंबईचा संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), मुशीर खान, दिव्यांश सक्सेना, सरफराज खान, सुवेद पारकर (उप-कर्णधार), प्रग्नेश कानपिल्लेवार, हर्ष आघाव, साईराज पाटील, आकाश पारकर, आकाश आनंद (विकेटकिपर), हार्दिक तामोरे (विकेटकिपर), श्रेयस गुरव, यश डिचोलकर, हिमस्थान, रोस्तान, रोल्या, त्या, दिव्यास. इरफान उमैर