चेन्नई सुपर किंग्जच्या छावणीत गोंधळ आहे. दरम्यान, मैदानाबाहेरून आलेल्या एका बातमीने अचानक खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की ऋतुराज गायकवाड यांनी महेंद्रसिंग धोनीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. कोपराच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला आयपीएल 2025 च्या हंगामातून अधिकृतपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर आणि धोनीची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांनी ही बातमी आली आहे.
advertisement
एकीकडे ऋतुराजच्या अचानक एक्सिटने सर्वानाच आश्चर्यचकित केले पण धोनीच्या कर्णधारपदाने चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह पाहायला मिळाला. तथापि, ऋतुराजला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचं चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये धोनी संघाचे नेतृत्व करेल याची घोषणाही करण्यात आली.
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या घोषणेनंतर काही तासांतच, ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या सराव सत्रात उजव्या हाताने फुटबॉल फिरवताना दिसला. हा तोच हात होता ज्याला फ्रॅक्चर झाल्याचे म्हटले जात होते. जिओहॉटस्टारवर ऑन एअर समालोचक आकाश चोप्रा म्हणाले, 'जर त्याच्या कोपरात फ्रॅक्चर असेल तर तो चेंडू कसा हाताळेल?' मला हे समजत नाहीये. दरम्यान, इंस्टाग्रामवरील घटनेने अफवांना आणखी बळकटी दिली आहे. अनेक चाहत्यांना आता असे वाटते की ऋतुराज गायकवाड आणि संघ व्यवस्थापनात मतभेद असू शकतात आणि त्यामुळे त्याला बाहेर बसवण्यात आले असावे.