दोन वर्षांनंतर, विल्यम्सच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला. त्याने आपले ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व सोडण्याचा आणि भारतीय पासपोर्ट घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे 32 वर्षीय विल्यम्स आता भारतीय राष्ट्रीय टीममध्ये निवडीसाठी पात्र ठरला आहे. या महिन्याच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशियाई कप 2027 च्या पात्रतेच्या मॅचमध्ये तो पदार्पण करण्याची शक्यता आहे. विल्यम्ससाठी मायदेशी परतण्याचा हा निर्णय मोठा असल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
विल्यम्सचा भारताशी असलेला संबंध त्याच्या कुटुंबाशी जोडला जातो. त्याचे आजोबा लिंकन एरिक ग्रॉस्टेट हे मुंबईतील प्रसिद्ध फुटबॉलपटू होते. त्यांनी तत्कालीन टाटा टीमकडून खेळताना 1956 च्या संतोष ट्रॉफी नॅशनल मॅचमध्ये बॉम्बेचे प्रतिनिधित्व केले होते. महान प्रशिक्षक सय्यद रहीम यांच्या हैदराबाद टीमकडून त्यांचा अंतिम टायटल थोडक्यात निसटला होता.
दरम्यान, विल्यम्स हा जपानमध्ये जन्मलेल्या इझुमी अराटा नंतर भारतीय नागरिकत्व स्वीकारणारा खेळाडू ठरला आहे. इझुमीने 2012 मध्ये भारतीय नागरिकत्व घेतले होते आणि तो 2013 साफ चॅम्पियनशिप आणि 2014 एएफसी कप पात्रता टीमचा भाग होता.
