सलमान अली आगा चांगलाच संतापला
सूर्यकुमारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा चांगलाच संतापल्याचं पहायला मिळालं. मी कधीही कोणत्याही संघाला हस्तांदोलन करण्यापासून परावृत्त होताना पाहिलं नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाही आम्ही हस्तांदोलन केलं. आमच्या संघाला अंतिम सामन्यात मोकळीक असेल, परंतु आम्ही आमच्या मर्यादेत उत्तर देऊ, असं सलमान अली आगा याने म्हटलं आहे. त्यावेळी सलमान आगा याला फोटोशूटच्या प्रकरणावर प्रश्न विचारला गेला.
advertisement
मी काहीच करू शकत नाही - सलमान आगा
फोटोशूटला यायचं की नाही, हा संपूर्ण निर्णय सूर्यकुमार यादवचा आहे. त्याचा यायचं असेल तर येईल नाहीतर नाही. मी त्यात काहीही करू शकत नाही, असं म्हणत सलमान अली आगा याने हतबलता दाखवली. त्यावेळी सलमान अली आगा काहीसा संतापल्याचं देखील दिसून आलं.
आम्ही खूप चुका केल्या पण... - सलमान अली आगा
दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो. आम्ही शेवटचे दोन सामने गमावले कारण आम्ही खूप चुका केल्या. फायनलमध्ये दोन्ही संघांना सारख्याच दबावाचा सामना करावा लागेल. होय, मी आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही आणि माझा स्ट्राइक रेट अपेक्षेनुसार नाही. 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करणं आवश्यक नाही. परिस्थितीनुसार खेळणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत सलमानने आपली चूक देखील कबूल केली आहे.