खरं तर सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला होता. या पराभवानंतर टीम इंडियावर वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याच संकट घोगावत आहे.त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर आणि कोच गौतम गंभीरवर प्रचंड टीका होते आहे. गंभीरसोबत वॉशिग्टन सुंदरच्या खेळीवर देखील टीका होत आहे. या दरम्यान संजय मांजरेकर याने ''गौतम गंभीरचा टीम इंडियात एकच कैलाश जीवन'' असल्याची टीका केली आहे.
advertisement
खरं तर कैलाश जीवन एक असं औषध आहे, जे जवळपास सगळ्याच रोगावर गुणकारी आहे. याचाच संदर्भ देत कैलाश जीवन करून एक औषध होतं. डोकं दुखलं तर ते लावा आणि पोटात काही त्रास झाला तर खायचं पण.त्यामुळे आमच्यावेळी सगळ्या समस्यांवर एकच औषध होतं. गौतम गंभीरचं देखील तसच आहे, त्याची पण प्रत्येक समस्येवर एकच औषध आहे ते म्हणजे वॉशिंग्टन सुंदर. कारण जर बॅटींगमध्ये काही समस्या जाणवली तर वॉशिंग्टन सुंदर आणि बॉलिंगमध्ये काही समस्या जाणवली तर वॉशिंग्टन सुंदरच,अशा शब्दात संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरवर सर्वात बोचरी टीका केली आहे. स्पोर्टस नेक्स्टमध्ये सूरू असलेल्या एका चर्चे दरम्यान संजय मांजरेकर बोलत होते. या चर्चेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
दरम्यान साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरला चौथ्या क्रमांकावर खेळवले होते. मात्र त्याला गंभीरने ज्या विश्वासाने मैदानात पाठवलं त्याप्रमाणे तो खेळी करू शकला नाही. त्याच्याऐवजी रिंकू सिंहला पाठवायला हवं होतं. कारण रिंकू सिंह अशा परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकला असता.त्यामुळे गंभीरच्या याच निर्णयावर प्रचंड टीका होते आहे.
