खरं तर आयपीएलचा संपूर्ण हंगाम रिषभ पंत बॅट चाललीच नाही. तो धावा काढताना मैदानात संघर्ष करताना दिसला होता. मात्र आज बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने 61 बॉल 118 धावांची सर्वांधिक खेळी केली. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 11 चौकार मारले आहेत. पंतच्या या खेळीच्या बळावर लखनऊ सूपर जाएंट्स 200 धावांच्या पार गेली.
advertisement
रिषभ पंतच्या खेळीवर आता संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे.संजीव गोयंका यांनी पंतच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये संजीव गोयंका यांनी 'Pant'astic पंतास्टिक असे लिहले आहे.अशाप्रकारे संजीव गोयंका यांनी रिषभ पंतचं कौतुक केले आहे.
दरम्यान रिषभ पंतच्या सर्वाधिक 118 धावा आणि मिचेल मार्शच्या 67 धावांच्या बळावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 227 धावा ठोकल्या आहे. त्यामुळे रॉयल चँलेंजर्स बंगळुरूसमोर 228 धावांचे आव्हान आहे. बंगळुरूकडून नुवान तुषारा, भुवनेश्वर कुमार आणि रोमारीओ शेफर्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w/c), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेशसिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरर्के