TRENDING:

IPL 2026 : संजू सॅमसनला वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट, चेन्नईची मोठी डील, जडेजा-सॅम करणचं काय होणार?

Last Updated:

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मोठी डील झाली आहे. रविंद्र जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात संजू सॅमसन अशी दोन्ही संघामध्ये डील सूरू आहे. पण ही डील फायनल झाली आहे का? याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sanju Samson Ravindra Jadeja Trade Window : आयपीएल 2026च्या हंगामासाठीच्या रिटेन्शनची अंतिम मुदत जवळ आली आहे. या दरम्यान अनेक संघांमध्ये ट्रेड सूरू आहे.त्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मोठी डील झाली आहे. रविंद्र जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात संजू सॅमसन अशी दोन्ही संघामध्ये डील सूरू आहे. पण ही डील फायनल झाली आहे का? याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.पण चेन्नई सुपर किंग्जच्या एका पोस्टने ही डील पक्की झाल्याचे बोलले जात आहे. कारण या पोस्टमध्ये संजू सॅमसन चेन्नईच्या ताफ्यात आल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
sanju samson
sanju samson
advertisement

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सध्या ट्रेड सूरू आहे.या ट्रेडनुसार चेन्नई सुपर किंग्ज संजू सॅमसनला संघात घेण्याच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला रविंद्र जडेजा आणि सॅम करनला देणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही संघामध्ये हा व्यवहार सूरू असताना आता चेन्नई सुपर किंग्जच्या एका पोस्टने खळबळ माजली आहे.

संजू सॅमसनचा आज वाढदिवस आहे.या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शुभेच्छा देताना चेन्नई लिहत की संजू तुला अधिक शक्ती प्रदान हो, तुला वाढदिवसाच्या 'सुपर' शुभेच्छा.ज्याप्रमाणे या पोस्टमध्ये चेन्नईने सुपर शुभेच्छाचा वापर केला आहे,ते पाहता संजूची डील पक्की झाल्याचे बोलले जात आहे.

advertisement

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नईत संजू सॅमसनच्या बदल्यात रविंद्र जडेजा आणि सॅम करन अशी डील सूरू आहे.या डीलला तीनही खेळाडूंची संमती मिळाली आहे आणि कागदपत्रे 48 तासांच्या आत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.आयपीएलच्या नियमांनुसार, एकदा फ्रँचायझींनी व्यापार सुरू केला की, लीग आणि, करनच्या बाबतीत, ईसीबीने अधिकृत होण्यापूर्वी हा निर्णय मंजूर करावा लागतो, जे आतापर्यंत सीएसके आणि राजस्थान रॉयल्सचे मौन स्पष्ट करते.

advertisement

दरम्यान सॅमसन गेल्या काही हंगामात आयपीएलमधील सर्वोत्तम टॉप-ऑर्डर फलंदाजांपैकी एक आहे. त्याने १४० च्या स्ट्राईक रेटने ४,३०० पेक्षा जास्त आयपीएल धावा केल्या आहेत आणि आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात आरआरचे नेतृत्व केले आहे, तसेच ५१ पेक्षा जास्त विजय टक्केवारी देखील आहे. एमएस धोनीच्या नंतरच्या आयुष्याची योजना आखणाऱ्या सीएसके संघासाठी, सिद्ध नेतृत्व क्षमता असलेला ३१ वर्षीय भारतीय कीपर-फलंदाज हा जवळजवळ परिपूर्ण उत्तराधिकार योजना आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
100 वर्षांची परंपरा, 30 प्रकारचे मिळतात पदार्थ, पुण्यातील बेकरी माहितीये का?
सर्व पहा

चेपॉक येथे सॅमसनचा रेकॉर्ड सामान्य आहे. पाच यूओएल डावांमध्ये त्याने फक्त ५९ धावा केल्या आहेत, सरासरी ११.८० आणि स्ट्राईक रेट १०० आहे. जर व्यवहार यशस्वी झाला तर त्याचे पहिले काम म्हणजे या मैदानावर धावांचा पाऊस पाडून त्याला बालेकिल्ला बनवले आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : संजू सॅमसनला वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट, चेन्नईची मोठी डील, जडेजा-सॅम करणचं काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल