'मी अजूनही खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. पण मी माझ्या निर्णयाबाबत समाधानी आहे. क्रिकेट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता आणि कायमच राहिल. मी माझ्या क्रिकेटमधल्या मित्रांसोबत पुन्हा जोडला जाऊ इच्छित आहे. चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मी इच्छुक आहे. आम्ही नव्या आठवणी बनवू', असं शिखर धवन म्हणाला आहे.
2010 साली शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच 187 रनची खेळी करून रेकॉर्ड केलं होतं. धवनने 34 टेस्ट, 167 वनडे आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 12,286 रन केले. 2022 साली धवन भारताकडून शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.
advertisement
आयपीएलमध्ये घडवला इतिहास
शिखर धवनने 2020 सालच्या आयपीएलमध्ये लागोपाठ दोन सामन्यांमध्ये शतक करून इतिहास घडवला होता. आयपीएलच्या इतिहासात तो अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर मारण्याचा विक्रमही शिखर धवनच्याच नावावर आहे.