TRENDING:

Shikhar Dhawan Sophie Shine : प्रेमाच्या मैदानात 'गब्बर'ची दुसऱ्यांदा विकेट, अखेर गर्लफ्रेंडने दिली नात्याची कबुली, पोस्टची एकच चर्चा

Last Updated:

Shikhar Dhawan Sophie Shine : भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पण प्रेमाच्या मैदानात तो काय अद्याप रिटायर झालेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shikhar Dhawan Sophie Shine : भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पण प्रेमाच्या मैदानात तो काय अद्याप रिटायर झालेला नाही. आणि आता प्रेमाच्या मैदानात त्याची दुसऱ्यांदा विकेट पडली आहे. कारण शिखर धवनच्या नवीन गर्लफ्रेंडेने आता त्यांच्या नात्याला कबुली आहे. त्यामुळे दोघे लवकरच आता लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा सूरू झाली आहे.

shikhar Dhawan sophie shine
shikhar Dhawan sophie shine
advertisement

घटस्फोटीत असलेला शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफीपासून एका तरूणीसोबत स्पॉट झाला होता. हीच तरूणी त्याच्यासोबत अनकेदा दिसून आली होती. ही तरूणी शिखर धवनची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे. या तरूणीच नाव सोफी शाइन आहे. जी बऱ्याच काळापासून शिखर धवनसोबत सतत दिसत होती.

शिखर धवनने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने स्वतःचा आणि सोफीचा एक फोटो शेअर केला. या फोटोवर लिहिलेले कॅप्शन खूप खास होते. कॅप्शनमध्ये "माय लव्ह" असे लिहिले होते.त्यामुळे धवनच्या गर्लफ्रेंडने नात्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

advertisement

बागेश्वर बाबांच्या मठात दोघांची हजेरी

शिखर धवनसोबत त्याची प्रेयसी सोफी शाइन हिनेही बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. धीरेंद्र शास्त्री यांनी शिखर धवनचे भगवी पगडी घालून स्वागत केले. यानंतर, माजी क्रिकेटपटूने सोफीसह येथे असलेल्या पारद शिवलिंगाची पूजाही केली. शिखर धवन आणि धीरेंद्र शास्त्रीही एकत्र क्रिकेट खेळले. धवनने प्रथम फलंदाजी केली आणि एका चेंडूवर धीरेंद्र शास्त्रीने माजी क्रिकेटपटूला बोल्ड केले. यानंतर धीरेंद्र शास्त्रीने फलंदाजी केली आणि धवनच्या चेंडूवर काही फटके मारले. गोलंदाजी झाल्यानंतर, पंडितजी धवनकडे गेले आणि गंमतीने म्हणाले की तो नो बॉल होता. सर्वांना हा सामना खूप आवडला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan Sophie Shine : प्रेमाच्या मैदानात 'गब्बर'ची दुसऱ्यांदा विकेट, अखेर गर्लफ्रेंडने दिली नात्याची कबुली, पोस्टची एकच चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल