शिखर धवनने त्याच्या आत्मचरित्रात 'द वन क्रिकेट, माय लाईफ अँड मोर'(The One Cricket, My Life And More)मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.या आत्मचरित्रात शिखर धवनने 2006चा एक किस्सा सांगितला आहे.त्यावेळेस शिखर धवन भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. या किस्स्याची माहिती देताना शिखर धवन त्याच्या आत्मचरित्रात लिहतो की, ती खूप सुंदर होती.मी पुन्हा तिच्या प्रेमात पडलो होतो.मला तिच्याशी लग्न करायचे होते,असे शिखर धवन
advertisement
लिहतो.
शिखर धवन पुढे लिहतो, मी सराव सामन्यात अर्धशतक ठोकून दौऱ्याची सुरुवात केली होती.माझा दौरा चांगला चालला होता. प्रत्येक सामन्यानंतर मी आयलीनला (नाव बदलले आहे) भेटायला जायचो.त्यानंतर मी तिला माझ्या हॉटेलच्या खोलीत आणायला लागलो.त्यावेळेस रोहित माझा रूम पार्टनर होता. त्यामुळे मी जेव्हा आयलीनला घेऊन यायचो.तेव्हा तो (रोहित) नेहमी माझ्याकडे तक्रार करायचा आणि विचारायचा की तू मला झोपू देशील का?असा सवाल करायचा.
यानंतर एके दिवशी मी आयलीनसोबत डीनरला जात असल्याची बातमी संपूर्ण संघात वाऱ्यासारखी पसरली.त्यावेळेस आम्ही एकमेकांचे हात धरून जात असताना एका निवडकर्त्याने आम्हाला लॉबीमध्ये पाहिले.तरीही मला वाटले नाही की मी तिचा हात सोडावा कारण आम्ही कोणताही गुन्हा करत नव्हतो. जर मी त्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली असती तर मला वरिष्ठ संघात निवडले गेले असते, परंतु माझ्या कामगिरीला नकार मिळाला.'
दरम्यान शिखर धवन कदाचित 2006 च्या त्याच्या मैत्रिणीशी लग्न करू शकला नसता, परंतु त्याच्या पहिल्या पत्नीचे ऑस्ट्रेलियाशी निश्चितच संबंध होते.धवनची पहिली पत्नी ऑस्ट्रेलियाची आयेशा होती.आता हे लग्न तुटले आहे आणि धवन आता आयरीश मुलगी सोफी शाइनसोबत नात्यात आहे.