पंजाब किंग्जमध्ये आदर मिळाला - श्रेयस अय्यर
एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून मी माझं शंभर टक्के देतो. जर मला आदर मिळाला तर कोणतीही गोष्ट मिळवणं शक्य आहे. पंजाबमध्ये हेच झालं. त्यांनी मला प्रत्येक प्रकारे पाठिंबा दिला, मग ते प्रशिक्षक असोत, व्यवस्थापन असो किंवा खेळाडू. मी व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांसोबतच्या प्रत्येक बैठकीत उपस्थित होतो आणि रणनीती आखण्यात योगदान देत होतो. मला हे खूप आवडलं, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
advertisement
केकेआरमध्ये पूर्णपणे सहभागी नव्हतो - श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर याने पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यातील ड्रेसिंग रुममधील वातावरणावर देखील भाष्य केलं. त्यावेळी त्याने मेगा लिलावासाठी केकेआरच्या योजनांबद्दल बोलताना अय्यरने मोठा खुलासा केला, मी संभाषणाचा भाग होतो पण पूर्णपणे सहभागी नव्हतो. मी जिथं आहे तिथं पोहोचण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागले आहेत, असंही श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.
श्रेयस गंभीरच्या टार्गेटवर
दरम्यान, टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस यांच्यातील छुप संघर्ष इथूनच सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं. याच संघर्षामुळे गौतम गंभीरने श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये देखील संधी दिली नाही, हे स्पष्ट दिसून येतं होतं. अशातच आता आशिया कपमधून डावलताच श्रेयसने गंभीरला टार्गेटवर धरलं आहे.