TRENDING:

Shreyas Iyer : 'हे पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं...', श्रेयस अय्यरच्या मनातली खदखद, निशाणा नेमका कुणावर?

Last Updated:

आयपीएल 2025 च्या फायनलमधील पराभवातून श्रेयस अय्यर अजून सावरलेला नाही, तोच त्याचं आणखी एक टी-20 ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2025 च्या फायनलमधील पराभवातून श्रेयस अय्यर अजून सावरलेला नाही, तोच त्याचं आणखी एक टी-20 ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. 10 दिवसांपूर्वी 3 जूनला आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करून आयपीएल ट्रॉफी पटकावली, यानंतर आता श्रेयस अय्यरला आणखी एका टी-20 स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. टी-20 मुंबई लीगच्या फायनलमध्ये सोबो मुंबई फाल्कन्सचं नेतृत्व करताना अय्यरचा पराभव झाला. 12 जूनला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मुकाबल्यात मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सनी ट्रॉफी जिंकली.
'हे पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं...', श्रेयस अय्यरच्या मनातली खदखद, निशाणा नेमका कुणावर?
'हे पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं...', श्रेयस अय्यरच्या मनातली खदखद, निशाणा नेमका कुणावर?
advertisement

158 रनच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सिद्धेश लाडच्या साउथ सेंट्रल टीमने 19.2 ओव्हरमध्ये विजय मिळवला आणि विजेतेपद जिंकले. लीग अॅम्बेसेडर आणि भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माही या सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.

अय्यरच्या विधानाने खळबळ

या सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. 'हे खूप थकवणारे आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ते तुमच्या मनात खूप राहतं. मला कोणत्याही विशिष्ट गोष्टीवर चर्चा करायची नाही, टीमने सर्वोत्तम प्रयत्न केले. फायनलला पोहोचेपर्यंत आम्ही फक्त एक सामना गमावला. हा असा सामना होता, ज्यात तुम्ही कुणालाही दोष देऊ शकत नाही. ही गोष्ट पाठीत खंजीर खुपसण्यासारखी आहे, जे मला आवडत नाही, यातून आम्ही बरंच काही शिकलो आहोत', असं श्रेयस अय्यर म्हणाला.

advertisement

'फायनल गमावल्यानंतर निराश होणे अगदी सामान्य आहे, या गोष्टी त्रास होण्यासारख्या आहेत, पण पुढच्या वर्षी जेव्हा खेळाडू परत येतील तेव्हा त्यांच्यात अतिरिक्त प्रेरणा आणि आत्मविश्वास असेल. या टीमला त्याच्या प्रयत्नांचा अभिमान वाटला पाहिजे', असं वक्तव्य श्रेयस अय्यरने केलं.

फायनलमध्ये अय्यर पुन्हा फेल

आयपीएलच्या फायनलप्रमाणे या फायनलमध्येही कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी ठरला. या सामन्यात अय्यर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, पण एक फोर आणि एक सिक्स मारून तो आऊट झाला. मयुरेश तांडेलने 32 बॉलमध्ये 50 रन आणि हर्ष आघावने 28 बॉलमध्ये 45 रन केल्या, त्यामुळे सोबो मुंबई फाल्कन्सने 157 रन केल्या. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 49 बॉलमध्ये 85 रन काढल्या.

advertisement

मुंबई साउथ सेंट्रलसाठी वैभव माळी सर्वात यशस्वी बॉलर होता. त्याने 4 ओव्हरमध्ये 2 बळी घेतले. आव्हानाचा पाठलाग करताना, कर्णधार सिद्धेश लाड आणि साहिल भगवंत जाधव यांनी 2.5 ओव्हरमध्ये 32 रन केल्या. सिद्धेश 15 रनवर आऊट झाला आणि साहिलने 22 रन केल्या, ज्यामुळे मुंबई साउथ सेंट्रलचा स्कोअर 42 रनमध्ये 2 असा झाला. चिन्मय सुतारच्या 49 बॉलमध्ये 53 रन आणि अवैस नौशाद खानच्या 24 बॉलमध्ये 38 रनच्या मदतीने मुंबई साउथ सेंट्रलने 19.2 ओव्हरमध्ये आव्हान पार केलं आणि मुंबई टी-20 लीगच्या ट्रॉफीवर कब्जा केला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : 'हे पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं...', श्रेयस अय्यरच्या मनातली खदखद, निशाणा नेमका कुणावर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल