तू वारंवार स्वत:ला सिद्ध केलंय - श्रेष्ठा अय्यर
श्रेष्ठा अय्यरने आपल्या मेसेजमध्ये 'सरपंच' संबोधून श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे. ती म्हणाली, "आमचा सरपंच, तू खरोखरच एक असाधारण व्यक्ती आहेस, तुझ्यामध्ये अविश्वसनीय प्रतिभा आहे! तुझ्याबद्दल कितीही सांगितलं तरी ते पुरेसं नाही. तु वारंवार स्वतःला सिद्ध केलं आहे आणि तुम्ही जे काही मिळवलं आहे त्याचा मला खरोखरच अभिमान आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे."
advertisement
माझ्या डोळ्यांत तुम्ही विजेते
ती पुढे म्हणाली, "या वर्षीच्या आयपीएलमधील तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठीच नव्हे, तर त्यासाठी केलेल्या अथक परिश्रमासाठी आणि समर्पणासाठी मी तुमचा आदर करते. तुम्ही माझे खरे चॅम्पियन, एक नैसर्गिक लीडर आणि प्रेरणा आहात. जिंकले किंवा हरले तरी तुम्ही माझ्या डोळ्यांत नेहमीच विजेता असाल."
लव्ह यू, पंजाब किंग्ज
पंजाब किंग्जच्या टीमसाठी तिनं लिहिलं की, "सड्डा पंजाब, हा एक अविश्वसनीय प्रवास होता! मला तुमच्या प्रत्येकाचा खूप अभिमान आहे. तुम्ही सर्वांनी वारंवार स्वतःला सिद्ध केले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, तुमच्या प्रत्येकासाठी खूप मोठे यश पुढे आहे! पुढच्या सीझनची आताच वाट पाहू शकत नाही! तुम्ही असंख्य मनं जिंकली आहेत आणि यामुळेच तुम्ही खरे विजेते आहात. लव्ह यू, टीम पंजाब किंग्ज!"
थोडक्यात, पंजाब किंग्जला अंतिम मॅचमध्ये विजयासाठी 191 धावांचे आव्हान होते, मात्र ते 184 धावाच करू शकले. श्रेयस अय्यर या मॅचमध्ये केवळ 1 बॉलवर 2 धावा करून बाद झाला, ज्यामुळे त्याला आणि त्याच्या टीमला बरीच टीका सहन करावी लागली आहे. असं असले तरी, श्रेयसने या सीझनमध्ये 604 धावा करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.