श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे मराठा रॉयल्ससमोर 158 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग मराठा रॉयल्सची सुरूवात चांगली झाली नव्हती. कर्णधार सिद्धेश लाड 15 आणि साहिल जाधव 22 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर मैदानात उतरलेल्या चिन्मय सुतारने 53 धावांची अर्धशतकीय आणि आवेश नौशाद 38 धावांची खेळी केली होती.दोन्ही खेळाडूंनी संघाला विजयापर्यंत आणल्यानंतर त्यांची विकेट पडली होती.
advertisement
दोन विकेट पडल्यानंतर मराठा रॉयल्स हरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या क्षणी रोहन राजेने 8 धावा करून मराठा रॉयल्सला फानयल जिंकून दिली.
दरम्यान श्रेयस मुंबई सोबो संघाची सूरूवात चांगली झाली नव्हती. अय्यर स्वता 12 धावावर बाद झाला होता. त्यानंतर मयुरेश तांडेलने 50 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी आणि हर्ष आघावच्या नाबाद 45 धावांच्या बळावर मुंबई सोबोने 157 धावा केल्या होत्या.
सोबो मुंबई फाल्कन्स (प्लेइंग इलेव्हन) : आंगक्रिश रघुवंशी (विकेटकिपर), इशान मुलचंदानी, अमोघ भटकळ, श्रेयस अय्यर (कर्णधार), हर्ष आघाव, आकाश पारकर, श्रेयांश राय, सिद्धार्थ राऊत, मयुरेश तांडेल, विनायक भोईर, यश डिचोलकर
मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): सिद्धेश लाड (कर्णधार), सचिन मधुकर यादव (विकेटकिपर),साहिल भगवंता जाधव, अवेस खान नौशाद, वैभव माळी, सक्षम पाराशर, आदित्य धुमाळ, रोहन राजे, मॅक्सवेल स्वामीनाथन, इरफान उमेर, रोहन राजेंद्र घाई