शुभमन गिल पूर्णपणे फिट नाही
गिलला कोलकात्यामधील पहिल्या कसोटी मॅचच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाली होती. दुसऱ्या दिवसाचा सामना संपल्यानंतर त्याला तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला आणि 19 नोव्हेंबर रोजी तो गुवाहाटीला रवाना झाला होता. मात्र, दुर्दैवाने, दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचसाठी तो पूर्णपणे फिट होऊ शकला नाही.
advertisement
ऋषभ पंतकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी
शुभमनच्या दुखापतीचे पुढील मूल्यांकन करण्यासाठी गिल आता मुंबईला जाणार आहे. गिलच्या अनुपस्थितीत विकेटरकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant will lead India in Guwahati ) दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल, असं बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. पण टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटणार का? असा सवाल विचारला जात आहे. कारण शुभमनच्या जागेवर कुणाचीही रिप्लेसमेंट जाहीर करण्यात आलेली नाही.
टीम इंडियाला वन डाऊनला म्हणजेच मीडल ऑर्डरमध्ये संयमी आणि तंत्रिकदृष्ट्या योग्य फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या जागेवर राईट हँडर फलंदाज हवा होता, असं मत तज्ज्ञांनी मांडलं होतं. अशातच बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
साऊथ अफ्रिका 1-0 ने आघाडीवर
दरम्यान, पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात काहीही करून जिंकावं लागणार आहे. सध्या साऊथ अफ्रिका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असल्याने टीम इंडियासाठी आगामी सामना करो या मरो असा असणार आहे. आता ऋषभच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया कशी कामगिरी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
