वनडे वर्ल्ड कप सर्वात मोठे चॅलेंज
दक्षिण आफ्रिकेत होणारा हा वर्ल्ड कप गंभीर यांच्यासाठी सर्वात मोठे चॅलेंज असेल, कारण तिथलं पीच आणि परिस्थिती आशियाई टीम्ससाठी नेहमीच आव्हानात्मक असतात, असं सौरव गांगुली म्हणाला आहे. 2027 चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यावर गांगुलीने चिंता व्यक्त केलीये.
advertisement
कोचिंगच्या कोचिंगचं खरं मूल्यमापन
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गंभीरची खरी कसोटी दक्षिण आफ्रिकेत लागेल, असं गांगुलीने म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेतील वातावरणात टीमची कामगिरी कशी राहते, यावरूनच गंभीर यांच्या कोचिंगच्या कोचिंगचं खरं मूल्यमापन होईल, असं गांगुलीने वाटतंय. मात्र, भारतीय टीमकडे सध्या असलेली गुणवत्ता पाहता, गंभीर या परीक्षेत नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास देखील सौरव गांगुलीने व्यक्त केलाय.
बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज
रेड बॉलच्या क्रिकेटबद्दल बोलताना गांगुली यांनी भारतीय बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजचा दाखला देत त्यांनी सांगितलं की, घरच्या मैदानावर खेळताना खेळपट्टी कशी असेल, याचा विचार करण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. टर्निंग ट्रॅक बनवण्यापेक्षा चांगल्या विकेट्सवर खेळल्यास रिझल्ट अधिक चांगले मिळू शकतात, असं मत गांगुलीने 'मनी कंट्रोल'शी बोलताना व्यक्त केलं.
गौतम एक अत्यंत चांगला कोच
दरम्यान, सौरव गांगुली यांनी शेवटी गौतम गंभीरचे कौतुक करताना सांगितलं की, गौतम एक अत्यंत चांगला कोच आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वीच मी सांगितलं होतं की त्यांना थोडा वेळ देण्याची गरज आहे, असंही सौरवने यावेळी म्हटलंय. गौतम गंभीरचा कार्यकाळ वनडे वर्ल्ड कपनंतर संपणार असल्याने गंभीरसाठी वनडे वर्ल्ड कप करो या मरो असा असणार आहे.
