साऊथ अफ्रिकेची बॅटिंग ढेपाळली
दक्षिण आफ्रिकेची सुरूवात संथ झाली. एडन मार्करम याने सर्वाधिक 31 धावा केल्या. याशिवाय रायन रिकलटन 23, विआन मल्डर 24 आणि टोनी डी झोर्झी 24 धावा काढून परतले. या चार बॅटर्सव्यतिरिक्त एकालाही 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कॅप्टन टेम्बा बावुमा फक्त 3 धावांवर आऊट झाला. ट्रिस्टन स्टब्स याने 15 धावा काढून एक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सलामीवीरांची विकेट गेल्यानंतरच साऊथ अफ्रिकेचा डाव ढेपाळण्यास सुरूवात झाली.
advertisement
जसप्रीत बुमराहचा पंच
जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक स्विंग आणि अचूक बॉलिंगने दक्षिण आफ्रिकेच्या 5 बॅटर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामध्ये एडन मार्करम, रायन रिकलटन, टोनी डी झोर्झी आणि केशव महाराज यांच्या महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. तर मोहम्मद सिराजने मार्को जानसेन आणि काईल वेरेन्ने या दोघांना क्लीन बोल्ड करत 2 विकेट्स घेतल्या.
कुलदीपने दाखवली फिरकीची जादू
भारताच्या स्पिनर्सने देखील कमाल केली. टीम इंडियाने खेळवलेल्या चार स्पिनर्सपैकी कुलदीप यादव याने कॅप्टन बावुमासह 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल याला 1 विकेट मिळाली. वॉशिंग्टन सुंदर याला विकेट मिळाली नसली तरी त्याने दुसऱ्या बाजूने दबाव कायम ठेवला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर स्पिनर्सना मदत मिळत असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर गुंडाळल्यामुळे टीम इंडिया आता पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
