हैदराबादने दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची सूरूवात चांगली झाली होती. बंगळुरूकडून विराट कोहलीने आक्रामक खेळी करायला सूरूवात केली होती. मात्र अर्धशतकानजीक असताना कोहली बाद झाला. त्यानंतर कोहली पाठोपाठ विकेट्सची लाईनच लागली.
खरं तर आरसीबीची बॅटींग लाईन खूपच मोठी होती.त्यामुळे हे आव्हान आरसीबी सहज पु्र्ण करेल, अशी अपेक्षा होती.पण खेळाडू मैदानावर टीकू शकलेच नाही. फिल सॉल्ट 62 धावा खेळून बाद झाला.या खेळाडूं व्यतिरीक्त इतर खेळाडूंनी प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले.
advertisement
त्याचं झालं असं की मैदानात एव वेळ अशी होती.ज्यावेळेस बंगळुरुला 29 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता होती.त्यामुळे बंगळुरु सहज जिंकेल असे वाटत होते. पण ईशान मलिंगाच्या 16 व्या ओव्हरने अख्खी मॅच फिरवली. ईशान मलिंगा पहिल्यांदा रजत पाटीदारला रन आऊट केले. त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इशान मलिंगाने शेफर्डला कॉट अॅड बोल्ड केले. या दोन विकेटनंतर अख्खी मॅच फिरली.
ईशान मलिंगाच्या या दोन विकेटनंतर हैदराबादचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आणि त्यांनी एका मागून एक विकेट काढत 189 धावांवर आरसीबीला ऑलऑऊट केले आणि हा सामना 41 धावांनी जिंकला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (w/c), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा