पावरप्लेच्या शेवटच्या बॉलवर घोडचूक
सनरायझर्स हैदराबादने 227 धावांचा डोंगर उभारल्यानंतर हैदराबादला विजयासाठी आक्रमक कामगिरीची गरज होती. फिन अॅलन याने त्याच अंदाजात आक्रमण सुरू केलं. पण रहाणेने अँकर रोल निभावला. पण रहाणे आऊट झाल्यानंतर अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांच्यावर मोठी जबाबदारी होती. पण पावरप्लेच्या शेवटच्या बॉलवर घोडचूक झाली. अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांच्यात संवादाची कमतरता जाणवली अन् ग्रीन रन आऊट झाला. पण चूक कुणाची होती?
advertisement
कॅमरून ग्रीनला आऊट दिलं गेलं
पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अंगकृष रघुवंशी याने स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. त्यावेळी बॉल इशान मलिंगाच्या हातात गेला. तर अंगकृष रघुवंशी याने धाव घेण्याचा कॉल घेतला अन् कॅमरून ग्रीन नॉन स्ट्राईक एन्डवरून धावत सुटला. पण कॉल चुकीचा गेल्याने अंगकृष रघुवंशी काहीसा गडबडला अन् रन आऊट झाला. अंगकृष रघुवंशी मैदानातून बाहेर जात असताना अंपायरने त्याला थांबवलं अन् कॅमरून ग्रीनला आऊट दिलं. पण अंगकृष रघुवंशी नॉन स्ट्राईकला पोहोचला नाही अन् ग्रीनला आऊट का दिलं? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आयसीसीचा एक नियम कारणीभूत ठरला.
ICC चा नियम काय सांगतो?
दरम्यान, अंगकृष रघुवंशी याने शॉट मारून रन घेण्याचा कॉल दिला खरा पण त्याला रन आऊट होईपर्यंत कॅमरून ग्रीनला क्रॉस करता आलं नाही. त्यामुळे कॅमरून ग्रीनला रनआऊट दिलं गेलं. आयसीसीच्या नियमानुसार, दोन्ही खेळाडू धावत असतील अन् त्यांनी जर धाव घेताना एकमेकांना क्रॉस केलं नाही, तर त्या बाजूला रनआऊट झालाय, त्या बाजूचा खेळाडू आऊट असतो. याच नियमाला धरून कॅमरून ग्रीन याला आऊट दिलं गेलं अन् केकेआरचे 25 कोटी बुडाले.
