श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, हसारंगा, तीक्ष्णा आणि दिलशान मधुशंका यांना संघात घेतलं आहे. पण हे तंदुरुस्त झाले तरच खेळू शकणार आहेत. श्रीलंकेच्या संघात दिमुथ करुणारत्ने, दुनिथ वेल्लालागे, कसुन राजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा यांचाही समावेश आहे. वेल्लालागेने आशिया कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात ६ विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
advertisement
advertisement
वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), वानिंदु हसारंगा, महीश तीक्ष्णा, दिलशान मधुशंका, पथुम निसांका, कुसल जेनिथ, दिमुथ करुणारत्ने, चरित असालंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा समरविक्रमा, दुनिथ वेल्लालागे, कसुन राजिथा, मथीशा पथिराना आणि लाहिरू कुमारा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2023 1:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup : वर्ल्ड कपसाठी लंकेने घेतली रिस्क, संघात दुखापत झालेले दोन फिरकीपटू