वैभव सुर्यवंशी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता.याच राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी वैभव सुर्यवंशीच्या फलंदाजीचे कौतुक करत त्याच्या पहिल्या भेटीमागची रंजच कहाणी सांगितली आहे. 2023 मध्ये (जेव्हा तो 11 वर्षांचा होता आणि त्यानंतर त्याने करार केला तेव्हा दोन वर्षांचा होता) राजस्थान रॉयल्ससाठी सूर्यवंशीला खेळायला सांगितले होते.यावेळी पहिल्यांदात संगकाराने वैभव सुर्यवंशीला राजस्थानच्या कॅम्पमध्ये फलंदाजी करताना पाहिले होते. त्यावेळेस तो वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसारख्या खेळाडूंसमोर मोठे शॉर्ट खेळत होता. यावेळी त्याच्या बॅटचा आवाज बंदुकीच्या गोळ्यांसारखा येत होता,असे कौतुक संगकाराने वैभव सुर्यवंशीच्या फलंदाजीचे केले आहे.
advertisement
संगकाराने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या एका विश्लेषकाने एक मेसेज पाठवला की एक खास खेळाडू आहे ज्याला आपण पाहण्याची, चाचण्या घेण्याची आणि करारबद्ध करण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही त्याला करारबद्ध केल्यानंतर मी त्याला पहिल्यांदा लाईव्ह पाहिले, गुवाहाटीमध्ये नेटमध्ये फलंदाजी करतानातो जोफ्रा आर्चर इतर गोलंदाजांविरुद्ध बेधडक फलंदाजी करत होता,असे संगकाराने सांगितले.
पुढे तो म्हणाला, जेव्हा जेव्हा बॅट बॉलला स्पर्श करत होती तेव्हा त्याच्या बॅटचा आवाज बंदुकीच्या गोळीसारखा येत होता. त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे.तो त्याच्या शॉट रिपॉर्टायर आणि टी-२० फलंदाजात तुम्हाला हवे असलेले सर्व शॉट्स विकसित करण्यास खूप उत्साही आहे. ही त्याच्यासाठी आणखी चांगली होण्याची सुरुवात आहे आणि आशा आहे की खूप, खूप खास आहे,असे संगकाराने सांगितले.
दरम्यान आयपीएल 2025 च्या मध्यात जखमी संजू सॅमसनची जागा घेतल्यानंतर सूर्यवंशी आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. त्याने सात डावांमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक-रेटने 252 धावा केल्या होत्या.त्याच्या कामगिरीत गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत विक्रमी शतकाचा समावेश होता.सध्या तो इंग्लंड अंडर 19 संघाविरूद्ध टेस्ट सामने खेळतो आहे, येथे देखील तो धावांचा पाऊस पाडतोय.