TRENDING:

Sunil Gavaskar : डोळे पाणावले, कंठ दाटून आला! भर स्टेजवर भावुक झाले लिटिल मास्टर, पाहा Video

Last Updated:

Sunil Gavaskar Emotional for Nari Contractor : सुनील गावस्कर टीम इंडियाचे माजी क्रिकेट नारी कॉन्ट्रॅरक्टर यांना लाईट टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sunil Gavaskar Emotional In Award Function : टीम इंडियाला नेहमी योग्य सल्ला देणाऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांचं नाव येतं. कोणतेही मोठे सामने असले की टीम इंडियाच्या मदतीला सुनील गावस्कर धावून येतात. एवढंच नाही तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लहान मुलांसारखं नाचतात देखील... अशातच गावस्कर एका अवॉर्ड फक्शनमध्ये भावूक झाल्याचं पहायला मिळालंय. सुनील गावस्कर टीम इंडियाचे माजी क्रिकेट नारी कॉन्ट्रॅरक्टर यांना लाईट टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
Sunil Gavaskar Emotional In Award Function
Sunil Gavaskar Emotional In Award Function
advertisement

सुनील गावस्कर भावुक

मला हा अवॉर्ड देताना गर्व वाटत आहे, असं पहिलंच वाक्य म्हणताना सुनील गावस्कर भावुक झाले. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. त्याचे डोळे भरून आले होते. मी इथं नारी कॉन्ट्रॅक्टरला लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड देतोय. त्यामुळे मी थोडा इमोशनल होतो, मला माहिती आहे. आम्ही यांच्याकडून खूप काही शिकलो. ओपनिंग बॅटिंग करायला धाडस लागतं, असं गावस्कर म्हणाले अन् त्यांनी नारी कॉन्ट्रॅक्टर यांचा किस्सा सांगितला.

advertisement

1959 च्या लॉर्ट्स टेस्ट मॅचमध्ये....

मला आठवतंय की, मी टेस्ट मॅचची कॉमेन्ट्री ऐकत होतो. 1959 मध्ये लॉर्ट्स टेस्ट मॅचमध्ये इनिंगच्या सुरूवातीलाच नारी कॉन्ट्रॅक्टरच्या छातीवर बॉल बसला अन् त्यांच्या बरगड्या मोडल्या. तरी देखील यांनी पराभव मानला नाही किंवा मैदानातून पळ काढला नाही. तब्बल तीन तास यांनी बॅटिंग केली आणि 81 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यावेळी आमच्यासारख्या गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हा मोटिवेशनल गोष्ट होती, असंही गावस्कर यावेळी म्हणाले.

advertisement

Salman Ali Agha : नेमकी चूक कुणाची? मैदानात 'राडा' अन् वादग्रस्त Run Out नंतर भडकला सलमान अली आगा! काय म्हणाला?

तुम्हाला देशासाठी खेळायचं असेल तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

दरम्यान, त्यावेळी मला एक गोष्ट कळाली, जर तुम्हाला तुमच्या देशासाठी खेळायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जिवावर खेळून देशासाठी बॅटिंग करावी लागेल. मला आठवतंय नारी यांच्या डोक्याला देखील बॉल लागला होता, तरी देखील त्यांनी कमबॅक केलं. त्यावेळी असा काळ होता, जेव्हा हेलमेट्स नव्हते. तरी देखील यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतक ठोकलं होतं, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sunil Gavaskar : डोळे पाणावले, कंठ दाटून आला! भर स्टेजवर भावुक झाले लिटिल मास्टर, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल