ट्रॅव्हिस हेड अन् अभिषेक शर्माचं काय होणार?
पॅट कमिन्ससोबतच, सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (13 मॅचमध्ये 162.61 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 374 रन्स) आणि युवा बॅटर अभिषेक शर्मा (14 मॅचमध्ये 193.39 च्या दमदार स्ट्राइक रेटने 439 रन्स) या कोर ग्रुपमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक विकेटकीपर-बॅटर हेनरिक क्लासेन याच्या भवितव्याबद्दल मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
advertisement
हेनरिक क्लासेनला रिलीज करणार?
SRH फ्रेंचायझी मिनी-ऑक्शनपूर्वी हेनरिक क्लासेनला रिलीज करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या दोन सिझनमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, टीम आपल्या पर्समध्ये (लिलावासाठीची रक्कम) अधिक पैसे वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे क्लासेनसारख्या महागड्या परदेशी बॅटरवर पूर्णपणे खर्च करण्याऐवजी हैदराबाद त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
SRH कोणाला देणार नारळ?
दरम्यान, क्लासेनला रिलीज करून लिलावातून कमी किमतीत पुन्हा टीममध्ये घेण्याचा SRH चा प्रयत्न असू शकतो. तसेच सचिन बेबी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स, मोहम्मद शमी या खेळाडूंना देखील डच्चू दिला जाणार आहे. हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, राहुल चहर यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
SRH चे संभाव्य कायम ठेवलेले खेळाडू : ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, एशान मलिंगा, ॲडम झाम्पा, कमिंदू मेंडिस, अथर्व तायडे, अनिकेत वर्मा, जीशान अन्सारी.
SRH चे संभाव्य सोडलेले खेळाडू : हेन्रिक क्लासेन, सचिन बेबी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, राहुल चहर.
