शेवटच्या बॉलवर शिवम दुबेची चूक
कॅप्टन सूर्यकुमार यादव आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-ट्वेंटी मॅचमध्ये एका क्षणी त्याने आपला संयम गमावला. क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे झालेल्या या मॅचमध्ये एक घटना ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये 12 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर घडली. ऑस्ट्रेलियाला 168 रन्सचे आव्हान पार करायचे होते. शिवम दुबेने त्याच ओव्हरमध्ये टिम डेव्हिडला आऊट करून भारताला महत्त्वपूर्ण ब्रेकथ्रू मिळवून दिला होता.
advertisement
मार्कस स्टॉयनिस मैदानात आला अन्....
टिम डेव्हिड बाद झाल्यानंतर नवा बॅट्समन म्हणून मार्कस स्टोइनिस मैदानात आला. दुबेने त्याला सलग दोन बॉल डॉट टाकले, पण शेवटच्या बॉलवर शिवम दुबेकडून चूक झाली, ज्यामुळे सूर्या चांगलाच भडकला. दुबेने स्टोइनिसला ऑफ-स्टंपच्या बाहेर एक शॉर्ट बॉल टाकला, ज्यावर स्टोइनिसने बॅकवर्ड पॉइंटवरून फोर मारला. स्टोइनिसवर असलेला दबाव या ढिल्या बॉलमुळे कमी झाला आणि ऑस्ट्रेलियाला सहज फोर रन्स मिळाले. सूर्यकुमारने हा ढिल्ला बॉल टाकल्याबद्दल दुबेवर लगेचच नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळालं.
बॅटिंग ऑर्डरमध्ये दुबेला प्रमोशन
दरम्यान, टीम इंडियाने सिरीज 3-1 ने जिंकली तर आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं हे सर्वांसाठी मोठं स्टेटमेंट असणार आहे. काल बॅटिंग ऑर्डरमध्ये सूर्यकुमारच्या जागी शिवम दुबे याला वन डाऊनला पाठवण्यात आलं, तो तिसऱ्या सामन्यात नंबर 8 वर खेळला होता. पण शिवम दुबेला 18 बॉलमध्ये फक्त 22 धावा करता आल्या.
