काय म्हणाला सूर्या?
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने पीटीआयला मुलाखत दिली. 'एक वेळ अशी होती, जेव्हा तत्कालीन बीसीसीआय सचिव जय भाई यांनी मला श्रीलंका मालिकेच्या तीन-चार दिवस आधी फोन केला होता. त्यांनी फोन करून सांगितले की ते मला टी-20 टीमचा कर्णधार बनवत आहेत. त्यांनीच सर्वात आधी फोन केला होता', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
'पण मला माहीत होतं की रोहित भाई आणि अजित भाई यांनी हे आधीच ठरवून ठेवलं होतं. गौतम भाई नंतर आले. त्यांनी, राहुल सरांसोबत, जय भाईंशी यावर चर्चा केली होती. त्यानंतर, मला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.
टी-20 मध्ये सूर्याचं धमाकेदार रेकॉर्ड
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने 52 पैकी 42 टी-20 सामने जिंकले आहेत. सूर्याने त्याच्या कर्णधारपदाखाली एकही द्विपक्षीय टी-20 सीरिज गमावलेली नाही. सूर्यकुमार यादवने त्याच्या कर्णधारपदाखाली आणखी 8 विजय मिळवले तर तो टीम इंडियाचा सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार होईल. सूर्यकुमार यादवने भारताकडून 113 टी-20 सामने खेळले असून त्यात 3,272 रन केल्या आहेत.
