नेमकं काय झालं?
आपण चांगला खेळ दाखवला. चॅम्पियन झालात, पण प्रश्न असा आहे की, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तूझी पाकिस्तान संघासोबत वागणूक होती... तू हँडशेक केला नाही. आशिया कपच्या फायनलआधी ट्रॉफीसाठी फोटोशूट केलं नाही. त्यानंतर तू एक राजकीय प्रेस कॉन्फरेन्स केली. तू पहिला कॅप्टन आहेस, ज्याने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवलं, असं पाकिस्तानच्या पत्रकारने सूर्यावर आगपाखड केली. त्यावर सूर्याने हसला अन् उत्तर दिलं.
advertisement
पत्रकार परिषदेत सूर्याने पिकवला हशा
तुम्हाला उत्तर देऊ की नको... तुम्हाला आता राग येतोय, असं म्हणताच सूर्यासह संपूर्ण पत्रकार परिषदेत हशा पिकला. तुमचा प्रश्न कळालाच नाही, तुम्ही चार प्रश्न विचारून घेतले असं म्हण सूर्याने प्रश्नाला बगल दिली. पाकिस्तानच्या दुसऱ्या पत्रकाराने त्यानंतर सूर्याला घेरण्यासाठी थेट त्याच्या फॉर्मवर प्रश्न विचारला.
मी आऊट ऑफ फॉर्म नाहीये तर...
आशिया कपमध्ये तुमच्या बॅटमधून रन्स निघत नाहीयेत. टीम इंडियाचा स्किपर आऊट ऑफ फॉर्म आहे, असं म्हणत पाकिस्तानच्या पत्रकाराने सूर्याला घेरलं. त्यावर सूर्याने सिक्स मारला. मी आऊट ऑफ फॉर्म नाहीये तर मी आऊट ऑफ रन्स आहे. सराव केल्याने सगळं काही ठीक होतं. तुम्ही सराव करत राहिला पाहिजे, असं म्हणत सूर्यकुमार यादवने आणखी एक खणखणीत उत्तर दिलं.