TRENDING:

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा कॅच घेताना खरंच बाउंड्रीला पाय लागला होता का? द.आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मोठा खुलासा

Last Updated:

सूर्यकुमारने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाउंड्रीजवळ मिलरचा सुरेख कॅच घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: नुकतंच भारतीय क्रिकेट टीमने टी-20 वर्ल्ड कप मिळवून विश्व विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेची अंतिम मॅच रोमहर्षक झाली. या उत्कंठावर्धक मॅचमध्ये भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. निर्णायक क्षणी सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅच मॅचला कलाटणी देणारा ठरला; पण त्याच्या कॅचवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलं. त्यातल्या चुका दाखवण्याचा प्रयत्न झाला. यावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर शॉन पोलॉकने प्रतिक्रिया देऊन सूर्यकुमारची पाठराखण केली आहे.
(सूर्यकुमार यादव)
(सूर्यकुमार यादव)
advertisement

भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे; पण फायनल मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सूर्यकुमारने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाउंड्रीजवळ मिलरचा सुरेख कॅच घेतला. यादवच्या या कॅचमुळे संपूर्ण सामना फिरला आणि भारतीय संघ विजयी झाला. सूर्यकुमारचा हा कॅच जोरदार चर्चेत आहे. सूर्यकुमारने कॅच घेतला तेव्हा तो बाउंड्रीला स्पर्श करत होता. त्यानुसार ही विकेट नव्हे तर सिक्स रन असायला हवेत, असं पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटर्सनी म्हटलं आहे.

advertisement

(Hardik Pandya : वर्ल्ड चॅम्पियन होऊन झाले 4 दिवस, टीम इंडिया भारतात परतण्याआधीच हार्दिक पांड्याला मिळाली गुड न्यूज)

टी-20 वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला एका वेळी 30 बॉल्समध्ये 30 रन्सची गरज होती. हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर तुफान बॅटिंग करत होते; पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय बॉलर्सनी दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनला एक एक रन काढण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. दुसरीकडे भारतीय बॉलर्स दक्षिण आफ्रिकेचा एक एक बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये पाठवत होते. परिणामी भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात रन्सनी पराभव केला. यात सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅच जोरदार चर्चेत राहिला; मात्र या कॅचवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

advertisement

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी क्रिकेटर शॉन पोलॉकने या कॅचवर भाष्य केलं आहे. शॉन म्हणाला, की 'हा कॅच योग्य होता. बाउंड्री कुशन हलला नाही. खेळात अशा गोष्टी होत असतात. याचं सूर्यकुमारशी काही देणंघेणं नाही. तो कुशनवर उभा नव्हता. त्याने कौशल्याचा पुरेपूर वापर करून कॅच घेतला.' 'टाइम्स ऑफ कराची'ने शॉन पोलॉकचा व्हिडिओ शेअर केला. यात शॉनने सूर्यकुमारच्या कॅचवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा कॅच घेताना खरंच बाउंड्रीला पाय लागला होता का? द.आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल