एशियन गेम्स २०२३ च्या हेप्टाथलॉन क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मनने ५७०८ गण मिळवले. अंतिम फेरीत ती चौथ्या क्रमांकावर राहिली. भारताची एथलिट नंदिनी असागरा हिने ५७१२ गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले आणि कांस्य पदकावर नाव कोरलं. आता स्वप्नाने एक दिवसानंतर सोशल मीडियावरून तिने नंदिनीवर आरोप केला.
advertisement
स्वप्नाने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी चीनमध्ये एशियन गेम्स स्पर्धेत एका ट्रान्सजेंडर महिलेमुळे कांस्यपदक गमावलं. मला माझं पदक परत हवंय. कारण हे एथलेटिक्सच्या नियमांविरुद्ध आहे. माझी मदत करा असं आवाहनही तिने केलं होतं. मात्र काही वेळाने तिने ही पोस्ट डिलिट केली. स्वप्नाने तिच्या पोस्टमध्ये नंदिनीचे नाव घेतले नाही पण तिचा रोख नंदिनीकडेच होता.
स्वप्नाने दावा केला की, कांस्य पदक गमावल्यानतंर ती सर्वांचे चेहरे उघडे पाडणार आहे. मला हे पदक मिळाले नाही ज्यावर माझा अधिकार आहे. मला जर पदक मिळाले नाही तर मी सर्वांचे कारनामे उघड करेन. माझ्यावर झालेला अन्याय सर्वांसमोर आहे. ट्रान्सजेंडर एथलिट जिची टेस्टोस्टेरोन पातळी २.५ पेक्षा जास्त आहे आणि २०० मीटरपेक्षा जास्तच्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. कोणतीही मुलगी इतक्या वेगाने हेप्टाथलॉनमध्ये पुढे येऊ शकत नाही. मी यासाठी १३ वर्षे प्रशिक्षण घेतलंय. फक्त चार वर्षांच्या प्रशिक्षणाने ती इथपर्यंत पोहोचली असल्याचंही स्वप्नाने द ब्रिजशी बोलताना म्हटलं.