१९५२ च्या हेलिसंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी त्यानंतर आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यांना पदक पटकावण्यात यश मिळालं नव्हतं. तेजस्वीनी सावंत, राही सरनोबत यांनी ऑलिम्पिक स्पर्धात भाग घेतला. पण पदक पटकावता आलं नव्हतं.
भारतीय शूटर स्वप्निल कुसळे यानं नीलिंग पोजिशनमध्ये चांगली कामगिरी केली. सलग चार शॉट १० पेक्षा जास्त गुणांचे होते. सहाव्या फेरीनंतर स्वप्निल पाचव्या स्थानी पोहोचला होता. पण नंतर त्याने ४३ शॉटनंतर तिसऱ्या स्थानी झेप घेतली. प्रोन पोजिशनमध्येही स्वप्निलने सुरुवातीच्या प्रत्येक शॉटला 10.5 पेक्षा जास्त गुण मिळवले. त्याने पाचवे स्थान कायम राखले होते. तर स्टँडिंग पोजिशनमध्ये त्याने चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली होती.
advertisement
स्वप्निलने मंगळवारी झालेल्या पात्रता फेरीत ५० मीटर रायफल ३ पोजिशन शूटिंगमध्ये एकूण ५९० गुण मिळवत फायनल गाठली होती. त्याने निलिंगमध्ये १९८, प्रोनमध्ये १९७ तर स्टँडिंगमध्ये १९५ गुण मिळवले होते.