TRENDING:

T20 World Cup : धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने केला विक्रम, टी20 वर्ल्ड कपमध्ये कमाल

Last Updated:

अमेरिकेने टी२० वर्ल्ड कपमध्ये यासह तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. धावांचा पाठलाग करताना हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन : आयसीसी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात अमेरिकेने जबरदस्त अशी केलीय. एंड्रीज गौस आणि एरॉन जोन्स यांच्या जोडीने तडाखेबंद फलंदाजी करत कॅनडाच्या गोलंदाजीची हवा काढली. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद १९४ धावा केल्या होत्या. अमेरिकेच्या फलंदाजांनी हे आव्हान अवघ्या १७.४ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
News18
News18
advertisement

कॅनडाविरुद्ध आयसीसी टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी उतरलेल्या यजमान अमेरिकेच्या संघाने स्पर्धेची सुरुवात जबरदस्त अशी केली.  अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांनी अर्धशतके करत संघाने १९४ धावा केल्या. अमेरिकेला हे आव्हान कठीण जाईल असं वाटत होतं. त्यांचा आघाडीचा फलंदाज स्टीवन टेलर शून्यावर बाद झाला तर कर्णधार मोनांकसुद्धा १६ धावा करू शकला. तेव्हा सामन्यावर कॅनडाची पकड भक्कम असल्याचं वाटत होतं.

advertisement

अमेरिकेने सुरुवातीला दोन गडी गमावल्यानंतर एंड्रीज गौस आणि एरॉन जोन्स यांच्या जोडीने सामन्याचं चित्रच बदललं. दोघांनी फक्त अर्धशतके केली नाहीत तर कॅनडाच्या गोलंदाजांची धुलाई केली. एरॉन जोन्सने फत्त २२ चेंडूत ६ षटकार आणि एक चौकार मारत अर्धशतक केलं. तर एंड्रीज गौसने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह अर्धशतक केलं. फक्त ४० चेंडूत २३५ च्या स्ट्राइक रेटने जोन्सने १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

advertisement

अमेरिकेने टी२० वर्ल्ड कपमध्ये यासह तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. धावांचा पाठलाग करताना हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. याशिवाय दोन पेक्षा जास्त षटके राखून त्यांनी विजय मिळवला. पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेसाठी ही बाब आत्मविश्वास वाढवणारी ठरली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना विजय मिळवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर असून त्यांनी २०१६ च्या वर्ल्ड कपमध्ये २३० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध २०६ धावांचा पाठलाग करून विजय मिळवला होता. त्यानंतर आता अमेरिकेने धावांचा पाठलाग करताना मोठ्या विजयाची नोंद केलीय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने केला विक्रम, टी20 वर्ल्ड कपमध्ये कमाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल