भारताच्या 5 शहरात वर्ल्ड कपच्या मॅच
बीसीसीआयच्या बैठकीत प्रत्येक स्टेडियममध्ये 6-6 मॅच खेळण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सामने अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबईमध्ये होणार आहेत.
श्रीलंकेत 3 ठिकाणी होणार मॅच
टी-20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन भारतासोबत श्रीलंकेमध्येही होणार आहे. पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जातील. पण श्रीलंकेत कोणत्या तीन ठिकाणी मॅच खेळवल्या जाणार, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
advertisement
महिला वर्ल्ड कपच्या स्टेडियममध्ये मॅच नाही
नुकत्याच झालेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये ज्या स्टेडियमवर मॅच खेळवल्या गेल्या, तिकडे टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या जाणार नाहीत. गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर आणि नवी मुंबईमध्ये महिला वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या गेल्या होत्या. बंगळुरू आणि लखनऊमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच खेळवण्याबद्दल बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा झाली का नाही? याबाबत काही स्पष्ट झालेलं नाही.
