बांगलादेशमध्ये हिंदूंवर सूरू असलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर यपीएलमधून मुस्तफिजूर रहमानची हकालपट्टी करण्यात आली होती.या घटनेने आक्रामक झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात टी20 वर्ल्ड कप 2026 चे सामने न खेळण्याची भूमिका घेतली होती.यासंबंधी पत्र देखील त्यांनी आयसीसीला दिले होते.
पण आता बांगलादेशच्या या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा उपकरणे उत्पादक कंपनी सॅन्सपॅरेल्स ग्रीनलँड्स (एसजी) ने कर्णधार लिटन दाससह अनेक बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचे स्पॉन्सरशीप करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली तरी, खेळाडू आणि त्यांच्या व्यवस्थापकांना कळवण्यात आले आहे.दरम्यान जर असे झाल्यास बांगलादेश क्रिकेटर भिकेला लागण्याची शक्यता आहे.
advertisement
"मला अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती ऐकायला मिळालेली नाही,जी संघातील गोंधळ दर्शवते,असे एसजीने प्रायोजित केलेल्या एका बांगलादेशी क्रिकेटपटूने क्रिकबझला सांगितले.
तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर क्रिकबझशी बोलताना, बीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले की खेळाडू मानसिक तणावाखाली त.आहे "क्रिकेटपटूंसाठी हा खूप कठीण काळ आहे कारण त्यांना माहित नाही की येणारे दिवस त्यांच्यासाठी काय घेऊन येत आहेत. ते खूप तणावाखाली आहेत आणि ते स्वाभाविक आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की खेळाडू बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून निर्णयाची वाट पाहत आहेत जेणेकरून ते विश्वचषकाची तयारी सुरू करू शकतील.
